Tuesday, October 7, 2025

व्हॉट्अ‍ॅपवर नंबर नाही; आता दिसेल ‘युजरनेम’

व्हॉट्अ‍ॅपवर नंबर नाही; आता दिसेल ‘युजरनेम’

मुंबई (प्रतिनिधी) : प्रायव्हसीची (गोपनीयतेची) काळजी घेणाऱ्यांसाठी एक मोठी आणि चांगली बातमी आहे. लवकरच व्हॉट्अ‍ॅप एक असं फीचर आणत आहे, ज्यामुळे तुम्हाला कोणाशीही चॅट करताना तुमचा फोन नंबर दाखवण्याची गरज पडणार नाही. सध्या व्हॉट्अ‍ॅप वर तुम्ही कोणालाही मेसेज केल्यास, त्या व्यक्तीला तुमचा फोन नंबर दिसतो. मात्र, येणाऱ्या नवीन फीचरमुळे तुमचा नंबरऐवजी फक्त तुमचं युनिक यूजरनेम (Unique Username) दिसेल.

काय आहे 'यूजरनेम' (Username) फीचर?

या नवीन फीचरला 'यूजरनेम' (Username) असं नाव देण्यात आलं आहे. जे वापरकर्ते मेसेज पाठवताना आपला नंबर शेअर करू इच्छित नाहीत, त्यांच्यासाठी हे फीचर खूप फायदेशीर ठरणार आहे. या फीचरमुळे तुम्ही तुमचा आवडता यूजरनेम तयार करू शकाल. हा यूजरनेम तुमच्या प्रोफाइलवर दिसू शकेल आणि लोक तुमच्याशी तुमच्या नंबरऐवजी या यूजरनेमद्वारेच जोडले जातील. गोपनीयता (Privacy) वाढवण्यासाठी हे फीचर खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

टेस्टिंग फेजमध्ये आहे फीचर

WABetaInfo ने व्हॉट्अ‍ॅपच्या बीटा वर्जन 2.25.28.12 मध्ये या नवीन फीचरबद्दल माहिती दिली आहे. म्हणजेच, हे फीचर सध्या चाचणी (Testing) अवस्थेत आहे. लवकरच ते सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

यूजरनेम (Username) कसा निवडायचा?

WhatsApp यूजरनेम निवडण्यासाठी काही नियम लागू करत आहे:

यूजरनेमची (Username) सुरुवात 'www' ने होऊ शकत नाही. त्यामध्ये किमान एक अक्षर असणे आवश्यक आहे. तुम्ही अंक, अंडरस्कोर (_) आणि डॉट (.) यांसारखे काही विशिष्ट कॅरेक्टर्स वापरू शकता. या नियमांमागे कोणतीही फर्जी प्रोफाइल (Fake Profile) तयार होऊ नये किंवा कोणी वेबसाइट किंवा ब्रँडसारखे नाव निवडू नये, हा उद्देश आहे. असं यूजरनेम-आधारित चॅटिंग फीचर टेलिग्राममध्ये (Telegram) आधीपासूनच उपलब्ध आहे. त्यामुळे यूजर्सना नंबर शेअर न करता बोलता येतं. त्यामुळे हे फीचर व्हॉट्अ‍ॅपच्या प्रायव्हसी पर्यायांमध्ये एक मोठे पाऊल ठरणार आहे.

Comments
Add Comment