Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर बुधवारी सुनावणी

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर बुधवारी सुनावणी

मुंबई : शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटात धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर उद्या, बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्यासह गेलेत. त्यानंतर पक्ष आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह यावरून उद्ध ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेले. न्यायालयाच्या निर्देशानुसार निर्णय प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे आली. आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण (पक्षचिन्ह) एकनाथ शिंदे यांना दिले. परंतु, शिंदे गटाला हे चिन्हा कायमस्वरूपी मिळालेले नाही.

दरम्यान, न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्ह आणि नावाचा खटला सुरू आहे. 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या काळात राष्ट्रपती आणि राज्यपाल वादावर घटनापीठाची सुनावणी होणार होती त्यामुळे हा खटला लांबणीवर पडला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात पार पडतील. त्याआधीच खरी शिवसेना कुणाची हा निकाल सुप्रीम कोर्ट देणार आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे कायम राहणार की ते पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार हे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment