
मुंबई : आपल्या धमाल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया पुन्हा एकदा आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
भारतीने नुकताच एक मनमोहक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या सैलसर पोशाखात तिचा बेबी बंप दाखवत आहे. फोटोमध्ये तिचा आनंद अगदी स्पष्ट दिसत आहे. या फोटोसोबत तिने लिहिलं आहे – “मी पुन्हा गर्भवती आहे.”
View this post on Instagram
या गोड घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला. परिणीती चोप्रा हिने “माझ्या मुलीचे अभिनंदन” असे लिहून आपले प्रेम व्यक्त केले, तर दृष्टी धामी, दिव्या अग्रवाल, नीति टेलर, आणि पार्थ समथान यांनीही शुभेच्छा दिल्या.
भारतीने यापूर्वी अनेक मुलाखतींमध्ये तिची दुसऱ्या बाळाची इच्छा बोलून दाखवली होती. 'मुलगी व्हावी' अशी तिने भावना व्यक्त केली होती. डिसेंबर २०१७ मध्ये गोव्यात एक भव्य डेस्टिनेशन वेडिंग करून भारती आणि हर्ष विवाहबंधनात अडकले होते. तेव्हापासून त्यांनी वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यात एकत्र वाटचाल करत, ‘खतरा खतरा खतरा’ आणि ‘हुनरबाज’ यांसारखे यशस्वी शो एकत्र सादर केले आहेत.
एप्रिल २०२२ मध्ये त्यांनी आपल्या पहिला मुलगा लक्ष्यचे, म्हणजेच त्यांच्या लाडक्या ‘गोल्ला’चे स्वागत केले. भारती आणि हर्ष सोशल मीडियावर आपल्या कुटुंबातील अनेक खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात ज्याला त्यांचे चाहते उत्तम प्रतिसाद देतात.
या नव्या प्रवासात पाऊल टाकताना, या गोड जोडप्यावर चाहत्यांचा आणि मित्रपरिवाराचा प्रेमळ शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.