
मोहित सोमण:जागतिक स्तरावर आणखी एकदा सोन्याचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. जागतिक अस्थिरतेचा दबाव आजही कमोडिटीत असल्याने सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सलग दुसऱ्यांदा ही उच्चांकी (All time High) वाढ झाली.त्या मुळे सोन्याचे दराने तब्बल १२२००० आकडा पार केला आहे. काल युएस बाजारात सोन्याचे मानक प्रति डॉलर दर ३९०० औंसवर गेले होते. आज हा आकडा संध्याकाळपर्यंत ३९५८ औंस पार केला आहे. भारतीय सराफा बाजारातही आजही घसरण झाल्याने सो न्यातील दबाव कायम होता. परिणामी ही वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १२५ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११५, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ९४ रूपयांनी वाढ झाली आहे. प रिणामी सोन्याचे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२२०२, २२ कॅरेटसाठी १११८५, १८ कॅरेटसाठी ९१५२ रूपयांवर गेले आहेत. आज जागतिक बाजारपेठेत सत्राच्या सुरुवातीला $३९७७.४५/औंसचा उच्चांक गाठल्यानंतर स्पॉट गोल्ड ०.४% वाढून $३९७४.५७/औंस झाला. डिसेंबरसाठी सोन्याचा वायदा $४०००.०५/औंसचा उच्चांक गाठल्यानंतर सकाळी ०.६% वाढून $३९९८.१२/औंस झाला होता.
माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळ दरात १२५०, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ११५०, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ९४० रूपये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १२२०२० रूपये, २२ कॅरेटसाठी ११८५० रूपये, १८ कॅ रेटसाठी ९१५२ रूपयांवर गेला आहे. भारतीय सराफा बाजारातील मुंबईसह प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १२२०२ रूपये, २२ कॅरेटसाठी १११८५ रूपये, १८ कॅरेटसाठी ९१५२ रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजा रातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मध्ये आज सकाळच्या सत्रात तर सोन्याच्या फ्युचर निर्देशांकात थेट ६५१ रूपयांनी वाढ झाली होती. त्यामुळे एमसीएक्समधील सोन्याची दरपातळी १२०९०० या रेकॉर्ड ब्रेक पातळीवर पोहोचली होती. संध्याकाळपर्यंत एमसीएक्समध्ये सोन्याचा निर्देशांक ०.१८% उसळल्याने सोन्याची दरपातळी १२०४६३ रूपये किंमतीवर सुरू आहे. जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.१९% वाढ झाली आहे.
सोने सातत्याने वाढण्याची कारणे -
अमेरिकेतील सरकारच्या दीर्घकाळाच्या बंद (US Government Shutdown) आणि फेडरल रिझर्व्हच्या आगामी बैठकीत व्याजदर कपातीच्या वाढत्या शक्यतांमुळे मजबूत जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत वायदा बाजारात तेजी आहे. त्यामुळेच आज आशियाई बाजारातील कमोडिटीत मोठी वाढ झाली आहे.मंगळवारी आशियाई व्यापारात सोन्याच्या किमती उच्चांकी वाढल्या आहेत अमेरिका, जपान आणि फ्रान्समधील वाढत्या राजकीय अनिश्चिततेमुळे मागणी वाढल्याने ते ४००० डॉलर प्रति औंसच्या विक्रमी उच्चांकी पा तळीवर राहिले.अमेरिकेच्या व्याजदर कपातीवरील सट्टेबाजीमुळे कमोडिटी बाजारांना चालना मिळाली आहे. या आठवड्यात फेडरल रिझर्व्हच्या वक्त्यांच्या मालिकेवर लक्ष केंद्रित केले गेले. पीपल्स बँक ऑफ चायनाने वाढलेली सोन्याची खरेदी दर्शविणारी आक डेवारीदेखील सराफा किमतींना पाठिंबा देत आहे.
२००८ च्या आर्थिक मंदीपासून २०२० च्या साथीपर्यंत, अनिश्चिततेचा अंदाज असताना सोन्यात ऐतिहासिकदृष्ट्या वाढ झाली आहे. यावेळीही भू-राजकीय तणाव, मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि चलनविषयक धोरणातील बदल या तेजीला बळ देत आहेत.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, गेल्या दशकात जगभरातील मध्यवर्ती बँकांनी त्यांच्या सोन्याच्या साठ्यात जवळजवळ दुप्पट वाढ केली आहे, जी जागतिक राखीव मालमत्ता म्हणून सोन्यावर विश्वासार्हता दर्शवत आहे. विशेषतः भारताने अस्थिर जागति क पार्श्वभूमीत आपला साठा सातत्याने वाढवला आहे. या वर्षी आणखी एक प्रमुख ट्रिगर म्हणजे नुकतीच सप्टेंबर २०२५ मध्ये यूएस फेडरल रिझर्व्हने २५-बेसिस-पॉइंट रेट कपात केली होती, जर कामगार बाजाराचा डेटा आणखी कमकुवत झाला तर लवकरच आ णखी एक कपात अपेक्षित आहे. कमी अमेरिकन व्याजदरांमुळे सामान्यतः डॉलर कमकुवत होतो, ज्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित-निवासस्थानांच्या मालमत्तेचा आश्रय घेत असल्याने सोन्याच्या किमती वाढत असतात. या गतीमध्ये सततचे भूराजकीय तणावाचा फ ट का, रशिया-युक्रेन संघर्ष, मध्य पूर्वेतील अशांतता आणि असमान जागतिक वाढ हे सर्व गुंतवणूकदारांना सोन्याच्या सुरक्षिततेकडे प्रवृत्त करत आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यूएस डॉलरच्या तुलनेत आयात केलेल्या सोन्याच्या किमतीत वाढ होते ज्या मुळे स्थानिक मागणी आणि परतावा आणखी वाढतो. गेल्या ३० वर्षांत, सोन्याने रुपयाच्या बाबतीत सुमारे ११% वार्षिक परतावा दिला असून तर डॉलरच्या बाबतीत तो सुमारे ७.६% होता.
गुंतवणूकदारांच्या दृष्टीने सोन्याच्या टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'फेडच्या बैठकीचे मिनिटे, अध्यक्ष पॉवेल यांचे भाषण आणि बेरोजगारी आणि नॉन-फार्म पे रोल डेटा यासारख्या महत्त्वाच्या प्रकाशनांसह अमेरिकेत मोठ्या डेटा आठवड्याची तयारी सुरू असल्याने, सोन्याचा भाव $३९५८ च्या जवळ अस्थिर होता, जो $३९८० आणि $३९४० च्या दरम्यान होता. अमेरिकेतील सरकारी बंद पडण्याची शक्यता अनिश्चितते त भर घालते, ज्यामुळे अस्थिरता वाढत राहते. देशांतर्गत बाजारात, एमसीएक्स (MCX) सोन्याचा भाव ११८५००-१२१५०० रूपयांच्या विस्तृत श्रेणीत व्यापार होण्याची अपेक्षा आहे, भावना सावध राहिल्या आहेत परंतु वाढीच्या बाजूने पक्षपाती आहेत.'
सलग तिसऱ्यांदा चांदीत उसळी !
सोन्यासह चांदीच्या दरातही आज पुन्हा तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. सोन्याप्रमाणेच भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर चांदी कमोडिटीत दबाव पातळी निर्माण झाली आहे. ' गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज १ रुपयाने वाढ झाली आहे तर प्रति किलो दर १००० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम चांदी १४७ रूपयांवर तर प्रति किलो चांदी १५७००० रुपयांवर पोहोचली आहे.मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर १५७० रूपये प्रति किलो दर १ ५७००० रूपये आहे. जागतिक सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.२८% घसरण झाली आहे. तर भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.०८% घसरण झाली आहे. त्यामुळे एमसीएक्समधील दरपातळी १४७४०० रूपयांवर पोहोचली आहे.
सकाळच्या सत्रातच अमेरिकन सरकारच्या शटडाऊनमुळे आणि फेडरल रिझर्व्हच्या दर कपातीच्या वाढत्या अपेक्षांमुळे चांदीच्या किमती १.२२% वाढून १४७५१९ पातळीवर स्थिरावल्या होत्या. निधी करार सुरक्षित करण्यात कायदेकर्त्यांना अपयश आल्याने सप्टें बरच्या रोजगार अहवालासह प्रमुख आर्थिक डेटा रिलीझ होण्यास विलंब झाला आहे, ज्यामुळे ऑक्टोबरमध्ये तिमाही दर कपात आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये आणखी एक कपात होण्याची अटकळ बळावली आहे. गुंतवणूकदार अतिरिक्त धोरण निर्देशांसाठी फेड गव्हर्नर स्टीफन मिरन आणि अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या टिप्पण्यांची देखील वाट पाहत आहेत.