लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा राष्ट्रीय महामार्गावर आज घडलेल्या भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला.बोलेरो गाडी आणि ट्रकच्या दरम्यान आलेल्या दुचाकीला दोन्ही वाहनांनी धडक दिल्याने हा अपघात झाला. . घटनास्थळी स्थानिक व वाहनांनी गर्दी केली होती, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करण्यात आला आहे.
औसा शहरातील पोतदार शाळेसमोर ही दुर्घटना घडली. बहिणीला कॉलेजला सोडण्यासाठी भाऊ प्रसाद शिंदे आणि गायत्री शिंदे हे दुचाकीवरून लातूरकडे निघाले होते. लातूरकडे जाणाऱ्या बोलेरो गाडी आणि ट्रकच्यामध्ये दुचाकी आल्याने बोलेरोने जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीचा तोल जाऊन दोघे रस्त्यावर पडले, आणि त्याच वेळी ट्रकने त्यांना चिरडले. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर बोलेरो आणि ट्रक दोन्ही वाहनांचे चालक वाहनांसह घटनास्थळावरून पळून गेले आहेत. पोलिसांकडून सध्या दोन्ही वाहनांचा शोध सुरू आहे. पोलिसांचे पथक शोधासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती औसा पोलीस ठाण्याचे अधिकारी रेवण धमाले यांनी दिली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच औसा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करुन दोन्ही वाहनांचा शोध सुरू आहे.






