Thursday, November 20, 2025

कार्तिकी यात्रेनिमित्त २६ ऑक्टोबरपासून विठुरायाचे २४ तास दर्शन

कार्तिकी यात्रेनिमित्त २६ ऑक्टोबरपासून विठुरायाचे २४ तास दर्शन

सोलापूर : कार्तिकी यात्रेनिमित्त २६ ऑक्टोबरपासून श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे. कार्तिकी यात्रेची मंदिर समितीने जय्यत तयारी केली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी दिली.

कार्तिकी यात्रा पूर्वनियोजना संदर्भात मंदिर समितीची बैठक झाली. बैठकीमध्ये कार्तिकी यात्रा नियोजनाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ॲड. माधवी निगडे, प्रकाश जवंजाळ, शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, पुरातत्त्व विभागाचे डॉ. विलास वाहणे, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे आदी उपस्थित होते.

कार्तिकी एकादशीला पुजेचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना...

दरवर्षी परंपरेनुसार आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री पूजा करतात. राज्याला उपमुख्यमंत्री असले तर ते कार्तिक एकादशीला पूजा करतात. पण राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्तिकी एकादशीच्या पूजेचं निमंत्रण द्यायचं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूजेचं निमंत्रण द्यायचं? या पेचात पंढरपूरची मंदिर समिती पडली होती. मंदिर समितीची काल महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. या बैठकीत विधी आणि न्याय विभागाकडे विचारणा करण्याबाबत ठरलं. त्यानुसार विधी आणि न्याय विभागाला विचारणा करण्यात आली. यानंतर विधी आणि न्याय विभागाने एकनाथ शिंदे पूजेला येतील, अशी माहिती दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >