Monday, October 6, 2025

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे, ज्याला पाहून लोक म्हणत आहेत की, "इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स..." या व्हिडिओमध्ये नेमके काय घडत आहे, हे काही क्षण तुम्हाला कळणार नाही, पण जेव्हा सत्य समजेल तेव्हा हसू आवरणे कठीण होईल.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक दृश्य दिसत आहे, ज्यात एक रेल्वेगाडी पुलावरून वेगाने जात आहे आणि या पुलाच्या खाली एक मोकळा रस्ता आहे. पण तरीही नागरिक आपली दुचाकी किंवा चारचाकी वाहने घेऊन या रस्त्यावरून जात असताना अचानक थबकतात. पहिल्यांदा पाहणाऱ्याला असे वाटेल की, येथे लाल सिग्नल लागला आहे किंवा मोठा ट्रॅफिक जाम झाला आहे. पण, व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यावर लक्षात येते की, पुढे कोणताही ट्रॅफिक सिग्नल नाही किंवा गर्दीही नाही. लोक केवळ पुलावरून जाणारी ट्रेन पाहून थांबले आहेत. हा व्हिडिओ तमिळनाडू राज्यातील असल्याचे सांगितले जात आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by R@hul (@iits_me_rahul)

वरच्या बाजूने ट्रेन जाताना पाहून रस्त्यावर असलेले काही बाईकस्वार थांबले आणि त्यांना पाहून बाकीचे नागरिकही आपोआप आपल्या गाड्या थांबवू लागले. काही रिक्षाचालकही तिथे पोहोचले आणि त्यांनीही रेल्वेच्या जाण्याची वाट पाहिली. समोरचा रस्ता पूर्णपणे मोकळा असतानाही या लोकांनी गाडी चालवली नाही. हा एक प्रकारचा 'डर' होता, ज्याने सर्व वाहनचालकांच्या गाड्यांवर ब्रेक लावला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, लोक यावर अनेक मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.

नेहमीप्रमाणेच, या व्हिडिओवर अनेक उत्सुक कमेंट्स येत आहेत. एका युजरने लिहिले की, भारतीय रेल्वेचे बायो टॉयलेट कसे काम करतात, हे सर्व लोक चांगलेच जाणून आहेत, त्यामुळेच ते थांबले. तर दुसऱ्या एका युजरने, "या लोकांना ब्रिज बांधणाऱ्या अभियंत्यावर (इंजिनिअर) अजिबात विश्वास नाही," अशी कमेंट केली. लाल दिव्यालाही जुमानणाऱ्यांना वरून चाललेल्या ट्रेनने थांबवले, असे म्हणत काही लोक या घटनेचा पुरेपूर आनंद घेत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, भारतीय नागरिकांची सार्वजनिक ठिकाणची भीती आणि जागरूकता (जी अनेकदा अनुभवातून येते) यातून दिसून येते.

Comments
Add Comment