Monday, October 6, 2025

Toyota Kirloskar Motors Sales : दिवाळीपूर्व काळात टोयोटाने सप्‍टेंबरमध्‍ये 'इतक्या' युनिट्सची बंपर विक्री

Toyota Kirloskar Motors Sales : दिवाळीपूर्व काळात टोयोटाने सप्‍टेंबरमध्‍ये 'इतक्या' युनिट्सची बंपर विक्री

मुंबई:टोयोटा किर्लोस्‍कर मोटरने सप्‍टेंबर २०२५ मध्‍ये तब्बल ३१०९१ युनिट्सची विक्री केली. या आकडेवारीमध्‍ये २७०८९ देशांतर्गत विक्रीचा समावेश आहे, तर ४००२ युनिट्स निर्यात बाजारपेठांमध्‍ये पाठवण्‍यात आल्या आहेत असे कंपनीने यावेळी स्पष्ट केले आहे टीकेएमने (Toyota Kirloskar Motor TKM) सप्‍टेंबर २०२४ मध्ये २६८४७ युनिट्सची विक्री केली होती. यात १६% वाढ झाल्याचे नोंदवत कंपनीने सप्टेंबर २०२५ मध्ये ३१०९१ युनिट्सची विक्री केली आहे.आर्थिक वर्षातील पहिल्या ६ महिन्यांची आकडेवारी पा हिल्यास टीकेएमने एप्रिल-सप्‍टेंबर २०२४ कालावधीत १६२६२३ युनिट्सची विक्री केली होती. यात १४% वाढ नोंदवत कंपनीने एप्रिल-सप्‍टेंबर २०२५ या कालावधीत १८४९५९ युनिट्सची विक्री केली आहे.

या वाढलेल्या विक्रीविषयी भाष्य करताना टीकेएमचे सेल्‍स-सर्विस-युज्‍ड कार बिझनेस उपाध्यक्ष वरिंदर वाधवा म्हणाले की, 'भारत सरकारने जीएसटी दरामध्‍ये केलेली सुधारणा आणि सणासुदीचा काळ सुरू होण्‍यासह बाजारपेठेतील उत्‍साह शिगेला पोहोचला आ हे. टीकेएममध्‍ये आम्‍ही ग्राहकांना जीएसटीचे संपूर्ण फायदे जारी केले आहेत, ज्‍यामुळे आमच्‍या पोर्टफोलिओसाठी मागणी वाढली आहे. सणासुदीच्‍या काळाला गती मिळत असताना आम्‍हाला पुढे प्रबळ कामगिरीचा आत्‍मविश्वास आहे. सध्‍या, आम्‍ही वेळेवर डिलिव्‍हरीला अधिक प्राधान्‍य देत आहोत, ज्‍यामुळे ग्राहक त्‍यांच्‍या आवडत्‍या टोयोटासोबत सण साजरीकरणाचा आनंद घेऊ शकतात आणि या सीझनला अधिक विशेष बनवू शकतात.'

सप्टेंबर महिन्यात टीकेएमने सुधारित सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह नवीन रूमियॉन लाँच केली ज्यात सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये प्रमाणित म्‍हणून सहा एअरबॅग्‍जची भर करण्‍यात आली आहे. ग्राहकांना संपूर्ण जीएसटी फायदे देण्‍यात आले आहेत, ज्‍यासह टीकेएमने वेईकल्‍स च्‍या किमती कमी केल्‍या. तसेच टीकेएमने ब्रँड अँम्‍बेसेडर म्‍हणून जपानमधील आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील प्रतिष्ठित परफॉर्मन्‍स ग्रुप ड्रम टाओसोबत सहयोग केला.

Comments
Add Comment