
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात किरकोळ वाढ झाली आहे. प्रामुख्याने जागतिक टेक्निकल सपोर्टच्या आधारे ही वाढ झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. सकाळच्या सत्रात जीएसटी कपातीमुळे वाढलेली खरेदी, जागति क कच्च्या तेलात झालेली घसरण, रिझर्व्ह बँकेने स्थिर ठेवलेला रेपो दर व निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील मजबूती या कारणांमुळे आज शेअर बाजारात सकाळी वाढ दिसत आहे. सेन्सेक्स बाजार उघडल्यावर ९४.७१ व निफ्टी ३०.७० अंकांने वाढ झाली आहे. सेन्से क्स बँक निर्देशांक ३४१.३६ व बँक निफ्टीत २९१.९० अंकांने वाढ झाली आहे. मात्र आज सकाळच्या सत्रात अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा ३.८२% उसळल्याने बाजारात सलग तिसऱ्यांदा वाढ होईल याची शाश्वती नाही. बाजारातील परदेशी सं स्था त्मक गुंतवणूकदारांच्या हालचालीवर पुढील बाजाराची दिशा अवलंबून असेल.निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) सकाळच्या सत्रात फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.८८%), प्रायव्हेट बँक (०.६८%),पीएसयु बँक (०.४१%) निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली आहे तर सर्वाधिक घसरण मेटल (०.६०%), ऑटो (०.४२%), फार्मा (०.४५%) निर्देशांकात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एबी लाईफस्टाईल (८.८७%), पुनावाला फायनान्स (५.२९%), बीएसई (३.३४%), दिल्लीव्हेरी (३.३२%), बलरामपूर चिनी (२.८३%), बजाज फायनान्स (२.३१%), युको (२.२७%), अपोलो हॉस्पिटल (२.०५%), बँक ऑफ बडोदा (१.६१%), ओएनजीसी (१.३१%), एसबीआय कार्ड (१.२२%), बँक ऑफ महाराष्ट्र (१.१७%), अदानी पॉवर (१.०२%), एचडीफसी एएमसी (०.९८%), जियो फायनांशियल सर्विसेस (०.८३%) समभागात झाली आहे. सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण एजिस लॉजि स्टिक्स (३.३१%), सम्मान कॅपिटल (२.८१%), साई लाईफ (२.६४%), वोडाफोन आयडिया (२.६१%), जिंदाल स्टील (२.५२%), एल अँड टी फायनान्स (२.४४%), अव्हेन्यू सुपरमार्ट (२.२९%), बर्जर पेंटस (१.५८%), एचबीएल इंजिनिअरिंग (१.५८%), फोर्स मोट र्स (१.५६%), सन टीव्ही नेटवर्क (१.५३%), आनंद राठी वेल्थ (१.४७%), सिप्ला (१.२६%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील पूर्व परिस्थितीवर विश्लेषण करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडच्या तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक अमृता शिंदे म्हणाल्या आहेत की,'भारतीय बेंचमार्क निर्देशांक आज स्थिर स्थितीत उघडण्याची अपेक्षा आ हे, गिफ्ट निफ्टी निफ्टी ५० मध्ये ८ अंकांची किरकोळ घसरण दर्शवित आहे. बाजारातील भावना सावधपणे आशावादी राहिल्या आहेत, जरी सततची अस्थिरता आणि मिश्रित जागतिक संकेत गुंतवणूकदारांच्या विश्वासावर परिणाम करत आहेत.निफ्टी ५० मागील सत्रात २४८०० पातळीच्या महत्त्वपूर्ण अंकाच्या वर गेला आणि अखेर २४८९४.२५ पातळीवर बंद झाला. नकारात्मक बाजूने, २४७५० पातळीच्या खाली ब्रेकडाउनमुळे २४६०० पातळीकडे आणि पुढे २४४०० (२००-दिवसांचा ईएमए EMA) पर्यंत कमकुवतपणा वा ढू शकतो. वरच्या बाजूस, २५००० पातळीवर तात्काळ प्रतिकार दिसून येतो (त्यानंतर २५१२० आणि २५३४०) या पातळींपेक्षा सतत पुढे गेल्याने तेजीची सातत्यता निश्चित होईल, तर त्या ओलांडण्यात अयशस्वी झाल्यास अल्पकालीन ट्रेंड श्रेणीबद्ध राहू शकेल.
बँक निफ्टीने ५५००० पातळीच्या वर तोडून आणि सलग दुसऱ्या दिवशी वाढ नोंदवून ताकद दाखवली. तथापि, विक्रीचा दबाव असल्यास पुन्हा उदयास येतो आणि निर्देशांक ५५१४० पातळीच्या खाली घसरतो, ५५००० आणि ५३८३२ (२००-दिवसांचा ईएमए EM A) कडे आणखी घसरण होऊ शकते. वरच्या बाजूला, तात्काळ प्रतिकार ५५८५० पातळीवर आहे, त्यानंतर ५६००० आणि ५६४०० पातळीवर आहे.'
सकाळच्या निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,' संस्थात्मक प्रवाहाच्या आघाडीवर, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) ३ ऑक्टोबर रोजी १५८३ कोटी किमतीच्या इक्विटी विकल्या, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) त्याच दिवशी ₹४८९.८ कोटी किमतीच्या इक्विटी खरेदी केल्या.सध्याची अनिश्चितता आणि वाढलेली अस्थिरता पाहता, व्यापाऱ्यांना विशेषतः लीव्हरेज्ड पोझिशन्समध्ये सावधगि री बाळगण्याचा सल्ला दिला जातो. रॅलीजवर आंशिक नफा बुक करणे आणि मागच्या स्टॉप-लॉसमध्ये कडक बदल करणे शहाणपणाचे राहील. निफ्टी २५,००० च्या वर टिकला तरच नवीन दीर्घ पोझिशन्सचा विचार केला पाहिजे. व्यापक ट्रेंड सावधपणे तेजीत अ सताना, ब्रेकआउट पातळी आणि जागतिक बाजारातील पुढे असलेल्या सत्रांबद्दल घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक असेल.'
आजच्या सकाळच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'वाढीला चालना देणाऱ्या चलनविषयक धोरणामुळे निर्माण झालेल्या सका रात्मक भावनांना सततच्या FII विक्रीमुळे अडथळा निर्माण झाला आहे, परंतु आर्थिक वर्ष २७ साठी वाढ आणि कॉर्पोरेट उत्पन्नाबाबतच्या सकारात्मक बातम्यांमुळे ते टिकून राहू शकते. आर्थिक वर्ष २७ मध्ये कॉर्पोरेट उत्पन्नात १५% पेक्षा जास्त वाढ होण्यास मदत करणारी वाढ मजबूत राहण्याची शक्यता आहे. अमेरिका-भारत व्यापार तणावाच्या सकारात्मक निराकरणाची बाजारपेठ उत्सुक असेल. व्यापार करार बाजारपेठेत तेजीसाठी ट्रिगर ठरू शकतो. या आघाडीवरील घडामोडींसाठी आपल्याला वाट पहावी लागेल.बा जारात येणारा ताजा पैसा ऑटोमोबाईल्स, वित्तीय आणि बँकिंग, टेलिकॉम, विमान वाहतूक, धातू, सिमेंट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म कंपन्यांसारख्या देशांतर्गत वापराच्या विषयांवर पाठलाग करत आहे. हा ट्रेंड टिकून राहण्याची शक्यता आहे. कोटक महिंद्रा बँके कडून क्रेडिट आणि ठेवींच्या वाढीवरील पहिल्या तिमाहीतील डेटा प्रभावी दिसतो.'