
मोहन भागवत : ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 'आपण सर्व हिंदू आहोत. ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली. धर्म किंवा भाषा काहीही असो, आपण सर्व एकच आहोत,' असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले. रविवारी मध्य प्रदेशातील सतना येथे मेहेर शाह दरबाराच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना ते बोलत होते. भागवत पुढे म्हणाले, "आज आपण स्वतःला वेगळे समजतो, पण वास्तव हे आहे की, आपण सर्व एकच आहोत. आपण कोणत्याही धर्म, भाषेचे किंवा प्रदेशाचे असलो तरी आपण हिंदू आहोत. आपल्यामध्ये फूट पाडणारे इंग्रज होते.
आपण स्वतःकडे आध्यात्मिक आरशातून पाहिल्यास आपण एकच आहोत, हे जाणवेल. अहंकार सोडून आत्मपरीक्षण केल्यास समाजात परिवर्तन येईल. खरे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारताचे आध्यात्मिक ज्ञान दैनंदिन जीवनात लागू केले पाहिजे. भारत जगाला शांती आणि समृद्धीचा संदेश देतो. "भागवत पुढे म्हणाले," जे लोक स्वतःला हिंदू मानत नाहीत, ते परदेशात जातात, तेव्हा संपूर्ण जग त्यांना हिंदू मानते. त्यांनी कितीही नाकारले तरी, सत्य हेच आहे की, ते हिंदू आहेत.