राष्ट्रपती बघणार कांतारा चॅप्टर १ चित्रपट

नवी दिल्ली : बॉलीवूड सोबतच आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचीही लोकप्रियता वाढत आहे. जगभर दाक्षिणात्य चित्रपट बघणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.


कांतारा या चित्रपटाने जवळपास ४०० कोटींचा गल्ला जमवला. देशात विदेशात सगळीकडेच त्याला लोकांची पसंती मिळाली . त्यातच आता कांतारा चॅप्टर १ हा चित्रपट लोकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट पुराणकथा या विषयाला धरुन असल्याने श्रद्धेचा आणि भावनेचा प्रश्न जपणे आवश्यक होते. या सर्व भावनांचा आदर करत चित्रपटाचा विशेष खेळ राष्ट्रपती भवन येथे होणार आहे.


ऋषभ शेट्टी कांतारा या चित्रपटामुळे घराघरात पोहोचला त्याची चित्रपटातील प्रचंड मेहनत दिसून आली आणि प्रेक्षकांना ती भावली. त्याच्या या उत्कृष्ट कामामुळे मागच्या वर्षीचा उत्कृष्ठ अभिनेता हा राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाला. हा चित्रपट राष्ट्रपती भवनात प्रदर्शित होत असल्याने भारतीयांचा चित्रपटसृष्टीविषयीचा आदर वाढला आहे.



कांतारा चॅप्टर १ चित्रपटाविषयी बोलताना अभिनेता ऋषभ शेट्टी याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. या सोबत त्याने त्याच्या काही आठवणीही शेअर केल्या आहेत. तो म्हणतो २०१६ सारखी एक वेळ होती जेव्हा एक शो साठी वाट बघावी लागत होती. पण आता ५००० पेक्षा जास्त सिनेमागृहात शो हाऊसफुल जात आहेत. आणि हा प्रवास प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेम, पाठिंबा, विश्वास आणि देवावरील श्रद्धा याशिवाय अपूर्ण आहे. मी त्या सगळ्यांचे आभार मानतो ज्यामुळे हे सर्व शक्य झाले; असे ऋषभ शेट्टी म्हणाले.



कांतारा चॅप्टर १ ची कमाई


कांतारा चॅप्टर १ चे दिग्दर्शन आणि लेखन स्वतः ऋषभ शेट्टी याने केले आहे. चित्रपटात रुक्मिणी वसंत,गुलशन देवैया,जयराम यांनी काम केले आहे. जगभरातून २५० कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने अवघ्या चार दिवसात हे पैसे कमावले आहेत. आता वीकेंडला हा चित्रपट ५०० कोटींचा टप्पा ओलांडेल असे मत व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

आलिया भट सोबत कोण दिसणार मुख्य भूमिकेत ? विकी कौशल की रणबीर कपूर ?

लवकरच रणबीर कपूर आणि विकी कौशल एका जबरदस्त सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . येत्या ईद ला संजय लीला

‘मुंज्या’ मधली शर्वरी आणि अहान पांडे अ‍ॅक्शन-रोमँटिक चित्रपटात झळकणार

मुंबई : अभिनेत्री शर्वरी वाघ लवकरच यशराज फिल्म्सच्या आगामी अ‍ॅक्शन आणि रोमँटीक चित्रपटात झळकणार आहे, ज्याचे

अरबाज खान झाला बाबा, पत्नी शुरा खानने दिला मुलीला जन्म

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान यांना रविवारी मुलगी झाली. ५८ व्या वर्षी अरबाज

'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात

मुंबई : 'बिग बॉस मराठी सीझन ५'चा विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतीच कोकण हार्टेड गर्ल

“जॉली एलएलबी ३” ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई; अर्शद वारसी आणि हुमा कुरेशीसाठी ठरतोय गेमचेंजर

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट प्रेक्षकांकडून भरभरून

रिया चक्रवर्तीला दिलासा: मुंबई उच्च न्यायालयाने पासपोर्ट परत करण्याचे दिले आदेश!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट