Monday, October 6, 2025

Paytm Digital Gold: पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन आणि त्याचे डिजिटल गोल्डमध्ये रूपांतर करा

Paytm Digital Gold: पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन आणि त्याचे डिजिटल गोल्डमध्ये रूपांतर करा

क्रेडिट कार्ड व रूपे क्रेडिट कार्डद्वारे युपीआय पेमेंटवर दुप्पट रिवॉर्ड्स

मुंबई:एमएसएमई व एंटरप्राइजेससाठी भारतातील आघाडीच्या मर्चंट पेमेंट्स लीडर आणि फायनान्शियल सर्व्हिसेस वितरण कंपनी असलेल्या पेटीएमने (Paytm) ‘गोल्ड कॉइन इनिशिएटिव्ह’ची घोषणा केली आहे.हा नवा उपक्रम प्रत्येक व्यवहाराला दीर्घकालीन बचतीची संधी बनवतो. ग्राहकांना प्रत्येक पेमेंटवर गोल्ड कॉइन मिळतील, जे ते सहजपणे डिजिटल गोल्डमध्ये रूपांतरित करू शकतात असे कंपनीने या नव्या घडामोडी दरम्यान म्हटले आहे.

कोठे मिळतील गोल्ड कॉइन?

स्कॅन अँड पे, ऑनलाइन खरेदी, मनी ट्रान्सफर, रिचार्ज, बिल पेमेंट्स आणि ऑटो/रिकरिंग पेमेंट्स यांसारख्या व्यवहारांवर गोल्ड कॉइन मिळतील. युपीआय, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेटबँकिंगद्वारे केलेले सर्व पेमेंट्स पात्र असतील. विशेष म्हणजे, क्रेडिट कार्ड किंवा रूपे क्रेडिट कार्डद्वारे युपीआय पेमेंट केल्यास दुप्पट गोल्ड कॉइन मिळतील.

प्रत्येक व्यवहारावर १% गोल्ड कॉइन मिळतील. जमा झालेले १०० गोल्ड कॉइन = १ रुपया मूल्याच्या डिजिटल गोल्डमध्ये रुपांतरित करता येतात. अशा प्रकारे कुटुंबे आणि व्यवसाय दोन्ही सहजपणे बचत करू शकतात. रिडेम्प्शन प्रक्रिया सोपी असून अतिरिक्त सोनं खरेदी करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे.

पेटीएम गोल्ड कॉइन डिजिटल गोल्डमध्ये कसे रूपांतरित करावे?

पेटीएम अँप उघडा आणि होम स्क्रीनवरील ‘गोल्ड कॉइन’ विजेटवर टॅप करा

तुमचा गोल्ड कॉइन बॅलन्स पाहा

बॅलन्स १५०० कॉइनपर्यंत पोहोचल्यावर ‘कन्व्हर्ट टू डिजिटल गोल्ड’ हा पर्याय सक्रिय होईल

त्यावर टॅप करून गोल्ड कॉइनचे डिजिटल गोल्डमध्ये सहज रूपांतर करा

(१०० गोल्ड कॉइन = १ रुपया मूल्याचे डिजिटल गोल्ड)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा