कांतारा चॅप्टर १ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसात जबरदस्त कमाई

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा चॅप्टर १ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी देशभर प्रदर्शित करण्यात आला. याआधी २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या कांतारा या चित्रपटाचा हा पुढील भाग आहे. कांतारा चॅप्टर १ चित्रपटातील दर्जेदार व्हीएफएक्स, कथानक, संगीत, पार्श्वसंगीत आणि रिषभ शेट्टीच्या अभिनयामुळे अवघ्या तीन दिवसात या चित्रपटाने २०० कोटींपर्यंतचा टप्पा गाठला आहे. असा अहवाल इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिला आहे. त्यामुळे कांतारा चॅप्टर १ ने चित्रपटसृष्टीमध्ये दिमाखात एन्ट्री केली असून कमाईच्या बाबतीत यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना मागे टाकले आहे.


कांतारा चॅप्टर १ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ८८ कोटींचा गल्ला भरला. आठवड्याच्या सरतेला म्हणजे शनिवारी सुमारे ५५ कोटी रुपये कमाई केली. हा आकडा शुक्रवारच्या कमाईपेक्षा जवळजवळ २० टक्क्यांनी जास्त आहे. तर रविवारी प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिल्यामुळे चित्रपटाने ६१.०० कोटी रुपयांची कमाई केली. ज्यामुळे भारतात या चित्रपटाची एकूण कमाई १६२.८५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर जागतिक स्तरावर या चित्रपटाने २५० कोटींचा मोठा टप्पा पार केला आहे. त्यामुळे चित्रपटाचा निर्मिती खर्च भरुन निघाल्याची चर्चा मनोरंजनसृष्टीत आहे. चित्रपटाच्या या दिमाखदार कमाईमुळे बॉलिवुडमधील छावा, सैयारा या चित्रपटांचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मागे पडला आहे.


चित्रपटात रिषभ शेट्टी सोबतच रुक्मिणी वसंत, जयराम, गुलशन देवैया आणि प्रमोद शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये इंग्रजी आणि हिंदी या भाषांसह कन्नड, तेलुगू, मल्याळम, तमिळ आणि बंगाली सारख्या अनेक प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित केल्याने सर्व भाषिकांना आपल्या सोयीनुसार चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येत आहे.

Comments
Add Comment

अमिताभ यांची अयोध्येत मालमत्ता खरेदी

अयोध्या : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत मालमत्ता खरेदी केली आहे. त्यांनी ‘हाऊस ऑफ अभिनंदन

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पूजा सावंत

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी

अक्षय कुमार–प्रियदर्शन पुन्हा एकत्र; ‘रामजी आके भला करेंगे’ टीझरमध्ये पीक कॉमेडीची झलक

भूत, धमाल आणि ओजी स्वॅग: ‘भूत बंगला’मधील ‘रामजी आके भला करेंगे’ गाण्याचा टीझर रिलीज मुंबई : भूत बंगला हा २०२६ मधील

लंडन फॅशन वीक २०२६ मध्ये क्रिती सॅनन हिने उधळला ग्लॅमर

लंडन : बॉलिवूडमधील आघाडीची स्टाइल आयकॉन Kriti Sanon हिने पुन्हा एकदा लंडन फॅशन वीकमध्ये आपल्या शानदार उपस्थितीने

अल्लू अर्जुन आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘AA22xA6’मध्ये नवी जोडी ठरली चर्चेचा विषय

मुंबई : भारतीय सिनेमात पहिल्यांदाच असा काहीतरी मोठा धमाका घडणार आहे, जो खऱ्या अर्थाने भव्य ठरणार आहे. दीपिका

संजय लीला भन्साळी मागील चार दशकांतले सर्वात महान दिग्दर्शक : रणबीर कपूर

मुंबई : आज संजय लीला भन्साळी यांचा वाढदिवस असल्याने, रणबीर कपूर यांनी या प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शकाला