Monday, October 6, 2025

Ex Date Expiry: आजच्या 'या' ४ कंपन्यांच्या लाभांश, Corporate Actions एका क्लिकवर -

Ex Date Expiry: आजच्या 'या' ४ कंपन्यांच्या लाभांश, Corporate Actions एका क्लिकवर -

१:१० स्टॉक स्प्लिट,२० रुपये लाभांश, १:१ बोनस इश्यू, राईट्स इश्यू -

अनेक कंपन्यांनी आज शेअर्सवरील लाभांश कमावण्यासाठी (Ex Date) अंतिम तारीख ठरवली आहे. आज ६ ऑक्टोबर २०२५ रोजी ही मुदत संपणार असून मुदत संपण्यापूर्वी शेअर्स असलेले गुंतवणूकदार लाभांश, बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट किंवा राईट्स इ श्यू सारख्या घोषित फायद्यांसाठी पात्र असतील. मुदत संपल्यानंतर शेअरहोल्डरचे हक्क निश्चित करण्यात ही तारीख महत्त्वाची भूमिका बजावते आणि याच दिवशी कॉर्पोरेट व्यवहाराचे मूल्यमापन करण्यासाठी स्टॉकच्या किमती सहसा समायोजित (Adjust) के ल्या जातात.

सिग्मा सॉल्व्ह लिमिटेड - (Stocks Splits)

सिग्मा सॉल्व्ह लिमिटेड आज ६ ऑक्टोबर रोजी स्टॉक स्प्लिट लागू करेल, ज्यामुळे त्यांच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य (Face Value) १० रुपयांवरून १ रुपये होणार आहे. या हालचालीमुळे शेअर्सची संख्या वाढेल आणि गुंतवणूकदारांसाठी ते अधिक परवडणारे होती लच तसेच कंपनीचे बाजार भांडवल अपरिवर्तित राहणार असल्याने आगामी काळात या शेअरमधील हालचाल पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सायबरटेक सिस्टम्स अँड सॉफ्टवेअर लिमिटेड - (Special Dividend)

माहितीनुसार, सायबरटेक सिस्टम्स अँड सॉफ्टवेअर लिमिटेडने प्रति शेअर २० रुपये विशेष लाभांश (Special Dividend) जाहीर केला आहे, मुदत संपण्याची तारीख (Last Date) देखील कंपनीने ६ ऑक्टोबर निश्चित केली आहे. ही एक-वेळची देयके शेअर हो ल्डर्सना नियमित लाभांशापेक्षा अतिरिक्त परतावा प्रदान करण्याच्या उद्देशाने केल्याचे कंपनीने म्हटले.

ज्युलियन अ‍ॅग्रो इन्फ्राटेक लिमिटेड (Bonus Shares)

ज्युलियन अ‍ॅग्रो इन्फ्राटेक लिमिटेड १:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करेल. शेअरहोल्डर्सना प्रत्येक शेअरसाठी एक अतिरिक्त शेअर मिळणार आहे माहितीनुसार, बोनस शेअर एक्स-डेट ६ ऑक्टोबर आहे, ज्यामुळे एकूण गुंतवणूक मूल्यावर परिणाम न होता चलनात असलेल्या शेअर्सची संख्या प्रभावीपणे दुप्पट होईल त्याचा थेट लाभ गुंतवणूकदारांना होईल.

अश्निषा इंडस्ट्रीज लिमिटेड (Right Issue)

कंपनीच्या माहितीनुसार, अश्निषा इंडस्ट्रीज लिमिटेड इक्विटी शेअर्सच्या राईट इश्यूसाठी ६ ऑक्टोबर रोजी एक्स-डेट तारीख निश्चिती करण्यात आली आहे. विद्यमान शेअरहोल्डर्स पूर्वनिर्धारित सवलतीच्या किमतीत अतिरिक्त शेअर्स घेऊ शकतात, ज्यामुळे कंपनी तील त्यांचा हिस्सा वाढवण्याची संधी मिळेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >