Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

नवरात्र काळात महालक्ष्मी मंदिरास ५७.१९ लाख रुपयांचे दान

नवरात्र काळात महालक्ष्मी मंदिरास ५७.१९ लाख रुपयांचे दान

थेट देणगीद्वारे १८ लाख, तर लाडू विक्रीतून १७ लाख रुपये

कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीला नवरात्र काळात लाखोंच्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांकडून २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध भाविक-भक्तांकडून ५७ लाख १९ लाख ४४२ रुपयांचे दान प्राप्त झाले आहे.

यात धार्मिक विधीसाठी ८ लाख ९३ सहस्र ३७३ रुपये, देणगी रुपये म्हणून १८ लाख ४४ सहस्र ८५५ रुपये, अन्नदान देणगी म्हणून ५ लाख ८२ सहस्र ७४९ रुपये, लाडू विक्रीतून १७ लाख ७ सहस्र २४ रुपये, साडी देणगीतून २ लाख ५० सहस्र ७०१ रुपये, शाश्‍वत पूजेतून १ लाख ११ सहस्र १२ रुपये मिळाले आहे, अशी माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली आहे.

२० लाखापेक्षा अधिक भाविकांनी घेतले देवीचे दर्शन !

यंदाच्या वर्षी भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात होती. मराठवाड्यात यंदा पूरस्थिती असल्याने श्री तुळजाभवानी देवीला जाणारे अनेक भाविक तिकडे जाऊ न शकल्याने ते कोल्हापूर येथे येत होते. प्रत्येक दिवशी हा आकडा दीड लाखांपेक्षा अधिक होता. ११ दिवसांत साधारणत: २० लाख पेक्षा अधिक भाविकांनी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. देवस्थान समितीने यंदा ‘ए.आय.’वापर केल्याने सी.सी.टि.व्ही.च्या माध्यमातून चोरांनाही पकडणे शक्य झाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >