विरार-सफाळे जलमार्गावर बोट फेऱ्या वाढणार

बंदरे विकास मंत्री नितेश राणेंचे निर्देश


विरार (प्रतिनिधी) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या विरार-सफाळे जलमार्गावर अतिरिक्त नौकेद्वारे वाढीव फेऱ्या सुरू करण्याचे निर्देश राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. या संदर्भात भाजपचे आमदार राजन नाईक यांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन वाढीव नौकेची मागणी केली होती.


मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वसई-विरार शहर व पालघर तालुक्यातील शेकडो प्रवाशांना नौका प्रवास सोयीस्कर पडत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून विरार-मारंबळ पाडा ते सफाळेपर्यंत सुरू झालेल्या या सेवेमुळे वाहनाबरोबरच प्रवाशांनाही प्रवास करणे सोयीचे असल्यामुळे नागरिकांची या सेवेला पसंती मिळाली. मात्र, मर्यादित फेऱ्यांमुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर आणखी अतिरिक्त नौका मंजूर करून वाढीव फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे आमदार राजन नाईक यांनी केली. त्यावर मंत्री नितेश राणे यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश मेरिटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच मारंबळपाडा ते सफाळेपर्यंत जादा नौकेतून वाढीव फेऱ्या सुरू होणार आहेत.


तसेच वाढवण बंदरामुळे खारवाडेश्री व नारिंगी येथून मोठ्या प्रमाणावर जहाजांची वाहतूक सुरू होईल. या जहाजांची बांधणी वा दुरुस्तीसाठी पालघर तालुक्यातील खारवाडेश्री व वसई तालुक्यातील नारिंगी येथे कार्गो जेट्टी यार्ड उभारावे, अशी मागणी सुद्धा आमदार नाईक यांनी मंत्री राणे यांच्याकडे केली आहे. याबाबत सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी मेरिटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कार्गो जेट्टीसाठी प्रयत्नशील आहोत, असे आमदार राजन नाईक यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Airtel Business Latest News: एअरटेल बिझनेसने इंडियन रेल्वे सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर (IRSOC) साठी बहु-वर्षीय करार जिंकला

एअरटेल एक ग्रीनफील्ड, बहु-स्तरीय, सायबरसुरक्षा 24x7x365 संरक्षण परिसंस्थेची रचना, बांधणी, अंमलबजावणी आणि संचालन करेल

डीपी वर्ल्डने हैदराबादची पहिली रीफर रेल फ्रेट सर्व्हिस न्हावा शेवा येथे सुरू केली

एक उपाय जो माल रस्त्यापासून रेल्वेपर्यंत नेतो आणि त्याचबरोबर खात्रीशीर जहाज कनेक्टिव्हिटी प्रदान करतो,

आधार कार्डच्या शुल्कात वाढ; नाव, पत्ता बदलण्यासाठी ७५ रुपये मोजावे लागाणरा

मुंबई (प्रतिनिधी): भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने १ ऑक्टोबर २०२५ पासून आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण सेवांच्या

‘स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास विमान उडू देणार नाही’

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तत्काळ करा अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातील हजारो

डिझाइन इंजिनीअर बनली मेट्रो पायलट

मुरबाड (वार्ताहर) : मेट्रो रेल्वेने दळणवळणाचा चेहरामोहरा बदलला आहे आणि या आधुनिक प्रवासाचे नेतृत्व आता एका

कांतारा चॅप्टर १ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसात जबरदस्त कमाई

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा चॅप्टर १ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी