Monday, October 6, 2025

'अनिल परबांनी आठ हजार रहिवाशांना धमकावून घरे रिकामी केली'

'अनिल परबांनी आठ हजार रहिवाशांना धमकावून घरे रिकामी केली'

मुंबई : विलेपार्ले येथील एका एसआरए योजनेतील आठ हजार रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी अनिल परब यांनी धमकावले, असा गंभीर आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव समर्थक आमदार अनिल परब यांच्यावर केला आहे. उद्धव समर्थक अनिल परबांमुळेच मुंबईतले आठ हजार मराठी रहिवासी देशोधडीला लागले आहेत, असाही आरोप रामदास कदम यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांनी हे आरोप केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता. त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले,’ असा सनसनाटी आरोप कदम यांनी दसरा मेळाव्यात केला होता. आता रामदास कदम यांनी अनिल परबांवर नव्या आरोपाची तोफ डागली आहे.

‘विलेपार्ले येथील एसआरएच्या योजनेसंदर्भातील प्रतिज्ञापत्र माझ्याकडे आहे. ही योजना अजून पूर्ण झालेली नसून, परब यांनी आठ हजार मराठी माणसांना घरे रिक्त करण्यासाठी धमकी दिली. या योजनेतील रहिवाशांना फ्लॅट देईन, असे अनिल परब यांनी सांगितले होते. ‘या आठ हजार रहिवाशांना फक्त एक वर्षाचे भाडे दिले. ही मराठी माणसे नऊ वर्षांपासून मुंबईबाहेर आहेत. हे पैशासाठी बिल्डरांचे पाय चाटतात. उबाठाचे पदाधिकारी संजय कदम आणि अनिल परब यांनी कोट्यवधी रुपये कमावले. बिल्डरने यांना मर्सिडीज दिल्या. संजय कदमने बाइक वाटल्या. याबाबत तिथल्या रहिवाशांनी याबाबत प्रतिज्ञापत्रे दिली आहेत,’ असे रामदास कदम म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >