Saturday, November 22, 2025

ही महादेवाची पवित्र भूमी, इथे 'आय लव्ह महादेव' हीच घोषणा चालेल

ही महादेवाची पवित्र भूमी, इथे 'आय लव्ह महादेव' हीच घोषणा चालेल

मीरा रोड : मीरारोड येथील जेपी नॉर्थ गार्डन सिटीमध्ये नवरात्रीच्या काळात गरबा खेळत असलेल्या महिलांवर धर्मांध समाजकंटकांनी अंडी फेकून वातावरण बिघडवण्याचा घृणास्पद प्रयत्न केला. या प्रकाराची माहिती मिळताच मंत्री नितेश राणे यांनी घटनास्थळाला भेट दिली. घडलेल्या प्रकाराची माहिती स्थानिकांकडून घेतली. तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. परिसरातील विजय विनायक गणेश मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले आणि उपस्थित नागरिकांना संबोधित केले. राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असल्यामुळे, समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. शांतता भंग करणाऱ्या विघातक प्रवृत्तीला ठेचून काढू; असे मंत्री नितेश राणे म्हणाले.

ही महादेवाची पवित्र भूमी आहे. इथे 'आय लव्ह महादेव' हीच घोषणा चालेल, असे मंत्री नितेश राणे म्हणाले. हा कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही महादेवाचा हिंदुस्तान आहे. इथे महिलांशी वाईट वर्तन करणाऱ्याला दणका दिला जाईल, यासाठी आवश्यकता भासली तर तिसरा डोळा उघडावा लागेल, असे मंत्री नितेश राणे म्हणाले. हिंदू राष्ट्रात महिलांवर अन्याय खपवून घेणार नही. महिलांना त्रास दिला तर थयथयाट होईल जो कोणाला सहन होणार नाही; असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.

?si=7eO88epaWlexPAeS
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा