फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी घडतात, घडलेल्या कित्येक गोष्टींमुळे मानसिक त्रास होतो. डोक्यात विचारांचे चक्र सुरू राहते. मानसिक त्रास कालांतराने शरीरावरही दिसू लागतात. झोपेवरही वाईट परिणाम होतात. दमल्यानंतर छान गाढ झोप लागेल असं वाटतं पण काही वेळा संपूर्ण रात्र या कुशीवरून त्या कुशीवर हीच गोष्ट सुरू राहते; काही केल्या झोप लागत नाही. सकाळ होताच झोप पूर्ण झालीच नाही, असे अनेकांना वाटतं. रात्री उशिरापर्यंत मोबाईल-लॅपटॉपचा वापर करणे, कामाचा ताण यासह अन्य गोष्टींचा झोपेवर परिणाम होतोय. या परिस्थितीस लोक ‘स्लीप एपिडेमिक’ म्हणत आहेत. आठ तासांची गाढ झोप आताच्या काळात महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट मानली जात आहे. याच शोधामुळे स्लीप टुरिझम हा नवा ट्रेंड उदयास आलाय व तो जगभरात वाढतही आहे.

‘स्लीप टुरिझम’ म्हणजे जेथे तुमचे प्राधान्य केवळ चांगली झोप मिळेल तेथे प्रवास करावा. पूर्वी हॉटेलमध्ये केवळ आरामदायी पलंग उपलब्ध असायचे; पण स्लीप टुरिझमच्या माध्यमातून संपूर्ण प्रवास तुमची झोप सुधारण्याच्या द़ृष्टीने डिझाईन केला जातो. आठवडाभर झोपेसाठी जागा उपलब्ध करून दिल्या जातात. काही ठिकाणी वैद्यकीय कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. काही ठिकाणी झोपेसाठी आवश्यक असणार्या स्पा ट्रीटमेंटही मिळतात.
पूर्वी लोक निरोगी आरोग्यासाठी केवळ आहार आणि व्यायामाची काळजी घेत होते; पण आता झोपेसही तितकेच महत्त्व दिले जातेय. एका सर्वेक्षणानुसार, भारतामध्ये ६१ टक्के लोक सहा तासांहून कमी तास झोपतात. या पार्श्वभूमीवर स्लीप टुरिझममुळे लोक तणावापासून दूर होऊन स्वतःशी जोडले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. भारतातही अनेक लोक या कारणामुळे हिमालयाच्या किंवा केरळच्या निसर्गरम्य ठिकाणी जात असल्याचे दिसून आले आहे.
Comments
Add Comment

५५ देशांच्या युद्धनौकांचे भारताच्या समुद्रात शक्तीप्रदर्शन होणार; पाच दिवसांचा संयुक्त अभ्यास, शस्त्र पाहणी

नवी दिल्ली : सध्याच्या भारत-पाकिस्तान, अफगाणिस्तान-पाकिस्तान, अमेरिका-भारत, अमेरिका-रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण,

ट्रेन तिकीटांच्या बुकींग नियमांत मोठा बदल; आता याच लोकांना मिळणार लोअर बर्थ

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन तिकीट बुकींगच्या प्रक्रीयेला अधिक सोपी आणि पारदर्शक

११ कोटींची लॉटरी जिंकली, पण विजेता गायब !

पंजाब : पंजाब सरकारने काढलेल्या दिवाळी बंपर लॉटरीमध्ये बठिंडा येथील एका व्यक्तीचे नशीब एका रात्रीत बदलले आहे. या

'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' चा वर्ल्ड रेकॉर्ड!

पंतप्रधान मोदींकडून महिला-केंद्रित आरोग्य अभियानाचे कौतुक नवी दिल्ली: 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' (Swasth Nari,

सिकंदर शेखमुळे महाराष्ट्राच्या कुस्तीला लागला बट्टा : पंजाब पोलिसांनी केली अटक

पुणे : महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा जिंकणं प्रत्येक कुस्तीपट्टूचं स्वप्न असतं. २०२३ - २०२४ वर्षी

दिल्ली नाही इंद्रप्रस्थ म्हणा, भाजप खासदाराची मागणी, अमित शाहंना पाठवलं पत्र

नवी दिल्ली : देशातील अनेक शहरांची आणि जिल्ह्यांची नावे बदलल्यानंतर 'आता थेट राजधानी दिल्लीचं नाव बदलण्याची