आत्मविश्वास हाच खरा अलंकार

संस्कृतीचा गोडवा : पूर्णिमा शिंदे


व्यक्तिमत्त्व विकासामध्ये आत्मविश्वास सर्वात महत्त्वाचा आहे. आत्मविश्वास जो तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो तो आणि तो कसा असावा या विषयी विश्वासाने बोला. निश्चितपणे ठामपणे आपली बाजू मांडा, ते बिंब प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावर आपल्या देहबोलीतून येऊ द्या. आपल्या विचारातून, शब्दातून मांडा आणि हा आत्मविश्वास कसा वाढवायचा, रुजवायचा, टिकून ठेवायचा हे देखील कौशल्यच आहे. आत्मविश्वासाचा पाया मजबूत असला पाहिजे. त्यासाठी प्रथम स्वतःवर प्रेम आणि श्रद्धा असावी. विचारांमध्ये सकारात्मकता असावी. प्रत्येक समस्येला तोंड देण्याची, त्या समस्येचे निराकरण करण्याची धाडसी वृत्ती बनवावी. व्यक्तिमत्त्व प्रयत्नपूर्वक प्रभावी करावे. आपली कृती, युक्ती, बुद्धी विचार, विवेक, तर्कवितर्क, कर्तृत्व हे सारं आपल्या आत्मविश्वासावरच अवलंबून असतं. त्यानुसार तुमची प्रगती होते. लहान मुलाचं उदाहरण घेऊया. ते उभे राहताना, पाऊल टाकायला शिकत असताना बऱ्याच वेळा धडपडते. पुन्हा उठते, बसते, धडपडते, खाली पडते मग ते कसं भिंती, वस्तू किंवा कुणाचं तरी आई-वडिलांचं बोट धरून उभं राहतं. आपण पाहत असतो की त्याचा खेळण्यातला पांघोळ गाडा आहे. त्याच्यामध्ये ते हळूहळू उभं राहतं. आधार धरतं आणि मग सराव करतो. मग ते न धरता ही पुढे उभे राहू शकते मग पडत नाही एकदा का उभे राहिला लागले तर त्याचा आत्मविश्वास त्याला घट्ट पकडून उभे राहता येतं आणि न धरता ही चालू शकत आहे ना मग तसं आपल्या आत्मविश्वासाचेही कुठेही न डगमकता, न धडपडता निश्चितपणे ठाम उभे राहता आलं पाहिजे. आत्मविश्वासाने आणि तो चेहऱ्यावर धडकला पाहिजे स्वतःमध्ये आपल्यामध्ये सकारात्मकता असावी. कौटुंबिक सामाजिक कार्यालयीन व्यवसायिक आणि इतर कोणत्याही बाबतीत हा आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण जीवन जगत असताना आपले वागणे आणि बोलणे हे कसे आहे त्यावरच आपली पुढील कार्यवाही ठरते. जे स्वतःवरच भरोसा नसेल. आपण डगमगलो आणि ते कृतीतून दिसले तर आपल्याला कोणत्याही प्रकारची इमेज निर्माण करता येणार नाही आणि इतरांच्या नजरेत सुद्धा आपली कुवत क्षमता कौशल्य ज्ञान यासाठी शंका उपलब्ध होईल म्हणूनच स्वतःमध्ये सगळ्यात महत्त्वाचा सरावाने प्रयत्नाने कौशल्याने रुजवावा तो गुण म्हणजे आत्मविश्वास! आपली चिकाटी, मेहनत, बुद्धीचा वापर हे सारं करत असताना खूप मेहनत घ्यावी लागते. त्या विचारांची धारणा शुद्ध सकारात्मक असावी लागते. मन, बुद्धी यांचे स्थैर्य असावं लागतं. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता त्या परिस्थितीवर मात करण्याची जिद्द, उमेद, सचोटी आणि कसोटी असायला हवी. चिकाटी सोडू नये. मग आपल्याला नुकसान पोहोचत नाही. मी ही गोष्ट करू शकतो! मी प्रयत्न करेन! मी करून दाखवीन! हे शिकवतो तो आत्मविश्वास. थोरा मोठ्यांच्या आयुष्यात, आदर्श व्यक्तींच्या आयुष्यात यश-अपयश येते, चुका येतात! पण त्या चुकांतून ते नवे नवे धडे घेतात. या चुकांकडे आपण कसे पाहतो? अपयशाकडे कसे पाहतो, वास्तव स्वीकारतो का, पुन्हा प्रयत्न करतो का आणि तो यशस्वी होतो का? हे लक्षात आलं पाहिजे.


थॉमस एडिसनचा बल्बचा शोध ९९९ वेळा फेल झाला असला तरी शेवटचा प्रयोग एक हजारावा प्रयोग सक्सेस किंवा यशस्वी झाला. त्यांनी हार मानली नाही. ते डगमगले नाहीत. व्यक्तिमत्त्वातली आपली त्रुटी, दोष, कमतरता निवारून, वजा करून आपल्या चुकांमधून आपण शिकायचे आणि सतत विवेक बुद्धीने हिताच्या चांगल्या गोष्टी स्वतःमध्ये आत्मसात करायच्या. समस्या सोडविताना साऱ्या मानसिक, शारीरिक कसोटीचा, शक्तीचा योग्य वापर करावा. निराकरण करावे. प्रसंगी निसंकोचपणे तोंड देता यावे. आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. आत्मविश्वासाने जगा, आत्मविश्वासाने बोला. सर्जनशीलता आणि सृजनशीलता म्हणजेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची जिद्द, ताकद, उमेद देतो तो असतो आत्मविश्वास. आपला दृष्टिकोन, वैचारिकता, प्रगल्भता हे सारं यावरच तर अवलंबून आहे. आपले जीवन आत्मविश्वासावर अवलंबून आहे. किती ताणतणाव आले तरी आत्मविश्वास असेल तर जगण्यात सुसह्यता येते. मानसिक ताण दूर होतो. मनापासून सुसंवाद साधणे. संवेदनक्षम, सौहार्दता आणि कृतिशील वृत्ती यामुळे सुद्धा आत्मविश्वास वाढीस लागतो आणि संघर्ष कमी होतो. म्हणून गरज आहे आत्मविश्वासाने जगण्याची. हा तो दागिना आहे जो जीवन चकाकीत, लखलखीत करतो. जगण्याला बळ देतो.

Comments
Add Comment

कैलास गुंफा मंदिर शिल्पकलेचा अद्वितीय नमुना

विशेष : लता गुठे महाराष्ट्रामध्ये पुरातन काळापासून देव, धर्म, संस्कृती आणि परंपरेला विशेष स्थान आहे हे आपल्या

आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे फक्त हिंदी चित्रपटांचे रिमेक इतर भारतीय भाषात होतात असे नाही. आपल्या मराठीतही

तुंबरू

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे नारायण! नारायण! करीत त्रिलोकांत भ्रमण करणाऱ्या देवर्षी नारदमुनींची

जीवनदान

प्रासंगिक : डॉ. विजया वाड उदयाचल हायस्कूल, गोदरेज, विक्रोळी-पूर्व ही अशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची शाळा ! इथे

एकजूट

जीवनगंध : पूनम राणे श्रीनिवास नावाची चाळ होती. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक तिथे राहत होते.

मुलगी झाली हो...

क्राइम : अॅड. रिया करंजकर सुरेखा ही दोन भावांची एकुलती एक बहीण. घरामध्ये सर्वांची लाडकी पण लहानपणापासूनच तिला