नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. डावखुरा वेगवान गोलंदाज शोरिफुल इस्लामने फलंदाजी आणि चेंडू दोन्हीतून उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने चार षटकांत फक्त १३ धावा दिल्या, एक विकेट घेतली आणि शेवटच्या षटकात नाबाद ११ धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने १९.१ षटकांत ८ बाद १५० धावा करून ५ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.
१४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, बांगलादेशची स्थिती अत्यंत बिकट झाली. ४ बाद १०२ वरून त्यांची अवस्था ८ बाद १२९ अशी झाली. सामना अफगाणिस्तानच्या बाजूने वळत असल्याचे दिसत होते. पण नुरुल हसन (३१, २१ चेंडू) आणि शोरीफुल इस्लाम (११, ६ चेंडू) यांनी शेवटच्या क्षणी संयम राखून संघाला विजय मिळवून दिला.
शमीम-झाकीरने बांगलादेशचा डाव सावरला १४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने पहिल्याच षटकात तन्जीद हसन आणि परवेझ इमॉन हे दोन्ही सलामीवीर गमावले. त्यानंतर सैफ हसनने दोन षटकार मारले आणि नंतर मुजीब उर रहमानने त्याला बाद केले. संघाची धावसंख्या २४/३ असताना, शमीम हसन (३३) आणि झाकीर अली यांनी चौथ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले.