ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर OCHA कडून पूर परिस्थितीवर एक रिपोर्ट प्रसिद्ध केला. सेव्ह द चिल्ड्रनने जलजन्य आजार आणि सर्पदंशाची प्रकरणे वाढत असल्याची माहिती दिली आहे. ज्यामुळे आरोग्यविषयक समस्या वाढत आहे. दक्षिण सुदानमध्ये उपासमारीचे संकट अजून वाढत असून जगातील सर्वात गंभीर संकट आहे.
संचालकांनी सांगितले की, दक्षिण सुदानमध्ये भविष्यात जे होऊ शकते ते मुलांसाठी धोकादायक असू शकते. मुसळधार पावसा अगोदरच अनेक शहरे जलमय झाली आहेत. ते पुढे म्हणाले की मदतीमध्ये करण्यात आलेल्या कपातीमुळे चॅरिटीच्या कामावर परिणाम झाला आहे. मदतीत तब्बल ३१ लाख अमेरिकन डॉलरची कपात करण्यात आली आहे. ज्यामुळे पोषण आणि बाल संरक्षण कार्यक्रमांच्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्यात आली आहे. ते म्हणाले की, समुदायाने शेतजमीन, उपजीविका, घरे, शाळा आणि आरोग्य सुविधांपर्यंतची पोहच गमावली आहे. वाढत्या पाण्याच्या स्तरामुळे ३,७९.००० मुले आणि प्रौढ स्थलांतरित झाले आहेत. संकटाच्या या काळात देशात अन्नटंचाई निर्माण झाली आहे. ७७ लाख लोक उपासमारीचा सामना करत आहेत तर ५ वर्षांची २३ लाख मुलांना कुपोषणाचा धोका आहे.