Saturday, October 4, 2025

सणासुदीत सप्टेंबर महिन्यातील वाहन विक्रीत मोठी वाढ ऑक्टोबर महिन्यात आणखी विक्री वाढणार 'या' कारणामुळे

सणासुदीत सप्टेंबर महिन्यातील वाहन विक्रीत मोठी वाढ ऑक्टोबर महिन्यात आणखी विक्री वाढणार 'या' कारणामुळे

प्रतिनिधी: सप्टेंबर २०२५ मध्ये २२ सप्टेंबर रोजी सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने प्रवासी वाहने आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीत पुनरुज्जीवनाची चिन्हे दिसू लागली आहेत.सिटी रिसर्चच्या मते, ऑगस्टपासून सुरू असलेली खरेदी आणि अलीकडील जीएसटी कपा तीनंतर किमतींमध्ये घट झाल्यामुळे मागणी वाढली.'काही ओईएमसाठी (Original Equipment Manufacturers OEMs) असलेल्या कंपन्यासाठी घाऊक विक्री (Wholesale) तुलनेने कमी राहिली आहे कारण १) डीलर्सकडून उशिरा मागणी आणि २) लॉ जिस्टिक्स अडचणी. ट्रॅक्टरचे प्रमाण विशेषतः मजबूत होते. व्यापक भावनिक ट्रेंड आणि जीएसटी कपातीचा संपूर्ण महिन्याचा परिणाम पाहता, आम्हाला ऑक्टोबरमध्ये खूप मजबूत विक्री अपेक्षित आहे असे नेमक्या शब्दात प्रकाशनात म्हटले गेले आहे. सणासुदी च्या काळातही जीएसटी दरकपातीमुळे मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय व सगळ्या स्तरावरील ग्राहकांनी वाहनखरेदीसाठी पसंती दर्शविली आहे. प्रकाशनानुसार,बजाज ऑटोने देशांतर्गत दुचाकी वाहनांच्या विक्रीत ५ % वाढ नोंदवली आहे, ज्यामध्ये महिना-दर-म हिना बेसिसवर (MoM) वाढ ४८% झाली आहे.निर्यात वार्षिक आधारावर १२% स्थिर राहिली. व्यावसायिक वाहनांमध्ये, देशांतर्गत विक्री (Domestic Sales) वार्षिक आधारावर एक टक्क्याने घटली, तर निर्यात वार्षिक आधारावर ६७% वाढली.

माहितीनुसार, टीव्हीएस मोटरने एकूण दुचाकी विक्रीत ११% वाढ नोंदवली. देशांतर्गत विक्रीत इयर ऑन इयर बेसिसवर १२% वाढ झाली आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतही ८% वाढ झाली आहे. हिरो मोटोकॉर्पने देशांतर्गत दुचाकी वाहनांच्या विक्रीत ५ % वाढ नोंदवली आहे, एकूण विक्रीत वार्षिक ८% वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, तिची निर्यात जवळजवळ दुप्पट झाली आहे जी इयर ऑन इयर बेसिसवर ९५% वाढली आहे असल्याचे यामध्ये दिसले आहे.मारुती सुझुकीने मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत प्रेस रि लीजमध्ये म्हटल्याप्रमाणे, सुमारे २००००० डिलिव्हरी आणि २५०००० प्रलंबित बुकिंगसह मजबूत किरकोळ मागणी अनुभवली आहे. तथापि, ऑक्टोबरच्या सुरुवातीला कमी होण्याची अपेक्षा असलेल्या लॉजि स्टिक आव्हानांमुळे टोयोटाला एकूण विक्री वगळता घा ऊक विक्रीत वार्षिक ८% घट झाली आहे. टोयोटाच्या विक्रीसह, देशांतर्गत विक्रीत वार्षिक ६% घट झाली आहे. दुसरीकडे, निर्यातीत वार्षिक ५२% वाढ झाली आहे, ज्यामुळे एकूण विक्रीत ३% टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे. ह्युंदाईच्या देशांतर्गत विक्रीत वार्षिक १% वाढ झाली आहे, जी पुनर्प्राप्ती दर्शवते, तर निर्यातीत वार्षिक ४४% मोठी वाढ झाली आहे. महिंद्रा अँड महिंद्राने युटिलिटी वाहनांच्या विक्रीत १०% वाढ आणि ट्रॅक्टरच्या विक्रीत ५०% लक्षणीय वाढ नोंदवली आहे. नवरात्रीच्या काळात मागणीमुळे ट्रॅक्टर विक्रीला फायदा झाला, जरी ट्रेलरची उपलब्धता मर्यादित होती.

टाटा मोटर्सने चांगली कामगिरी केली, देशांतर्गत प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक ४५ टक्क्यांनी वाढ झाली. व्यावसायिक वाहनांची वाढ स्थिर राहिली, लहान व्यावसायिक वाहने आणि पिक-अपमध्ये वार्षिक ३०% वाढ झाली. अशोक लेलँडने मध्यम आणि जड व्यावसायिक वाहनांसह ट्रक विक्रीत वार्षिक ५% वाढ नोंदवली, जरी बसचे प्रमाण वार्षिक ९% कमी झाले. आयशर मोटर्सने रॉयल एनफील्डसाठी आतापर्यंतची सर्वाधिक विक्री गाठली असून १२४३२८ युनिट्सची विक्री झाली, जी वार्षिक ४३% वाढली. ३५० सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या मोठ्या मॉडेल्सनीही उच्च जीएसटी दर असूनही चांगली वाढ नोंदवली.अहवालात असेही नमूद केले आहे की सप्टेंबरमध्ये उत्सवाच्या गतीची पहिली चिन्हे दिसून आली असली तरी ऑक्टोबरमध्ये जीएसटी फायदे आणि सुधारित लॉजिस्टिक्सचा संपूर्ण परिणाम अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा