Saturday, October 4, 2025

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा पाय अडकला. त्या तरूणाने आपला पाय सोडवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. अखेर अग्निशमन दल तसेच पोलिसांच्या मदतीने सुटका करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखालील एका खड्ड्यात एका तरुणाचा पाय अचानक अडकला.या तरूणाने खड्ड्यातून पाय बाहेर काढण्याचे बरेच प्रयत्न केले. अखेरीस अग्निशमन दल तसेच पोलिसांना पाचारण करण्यात आले.

यावेळी अग्निशमन दल तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खड्डा खोदला आणि अथक प्रयत्नांनंतर त्या तरूणाचा पाय खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला. दरम्यान, अशा प्रकारच्या घटनेंमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

Comments
Add Comment