पनवेल महापालिकेचा ९ वा वर्धापन दिन उत्साहात



पनवेल : पनवेल महापालिकेने ९ वर्षामध्ये देशपातळीवरती विविध सन्मान प्राप्त केले. महापालिकेची वास्तू जशी आयकॉनीक इमारत बनते आहे तशीच महापालिकेची प्रतिमाही आयकॉनीक बनावी यासाठी आयुक्त मंगेश चितळे व सर्व पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. महापालिकेच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्ताने शनिवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आ. प्रशांत ठाकूर म्हणाले, महापालिका विविध विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांशी जोडली जात आहे. विमानतळ सुरू झाल्यावरती पनवेलचे नाव वरच्या पातळीवरती येणार आहे. अनेक आव्हानांना तोंड देत, नागरिकांचे हित जपत आपण पुढे जायचे आहे. दशकपूर्ती वर्षारंभ करत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेशी जोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेविका चारूशीला घरत, शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवळे, शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त मंगला माळवे, अभिषेक पराडकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, सहायक संचालक नगररचना केशव शिंदे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे , लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीशिवाय उत्खनन?

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात सध्या सुरू असलेल्या बॉक्साइट उत्खननाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, या

थंडीच्या कडाक्याने आंबा मोहरला

उत्पादनात २० टक्के वाढ अपेक्षित; बागायतदारांच्या आशा पल्लवित अलिबाग : कडाक्याच्या थंडीमुळे आंबा कलमांना मोहर

जिल्ह्यात दहा नगर परिषदांमध्ये धक्कादायक निकाल

प्रस्थापितांना मोठा दणका सुभाष म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांचा कार्यकाळ संपल्यावर नगर

रोडपालीत शेकापचा ‘गड’ ढासळला

प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच

उरणच्या करंजा बंदराच्या कायापालटासाठी ७० कोटींची तरतूद

गाळाचा प्रश्न सुटणार, खासदार श्रीरंग बारणेंचा पाठपुरावा अलिबाग : उरण तालुक्यातील करंजा मच्छीमार बंदरात साचलेला

खोपोली नगर परिषदेत शिवसेनेचे वर्चस्व

नगराध्यक्षपदी कुलदीपक शेंडे; राष्ट्रवादी बॅकफूटवर खोपोली निवडणूक चित्र सुभाष म्हात्रे खोपोली : खोपोली नगर