
प्रतिनिधी:आरबीआयच्या माहितीनुसार, देशातील सोन्याचा साठा (Gold Reserves) ९५.०१७ अब्ज डॉलर्सच्या उच्चांकावर पोहोचला असून परकीय चलनसाठ्यात (Forex Reserves) मात्र ७००.२ अब्ज डॉलर्सवर घसरण झाली आहे. शुक्रवारी आरबीआयच्या आकडेवारीनुसार, २६ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा २.३३ अब्ज डॉलर्सने घसरून ७००.२७ अब्ज डॉलर्सवर आला असल्याचे निदर्शनास आले आहे. तर २६ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात, परकीय चलन मालमत्ता (Fo reign Exchange Assets) जो परदेशी साठ्याचा एक प्रमुख घटक असतो तो ४.३९ अब्ज डॉलर्सने कमी होऊन ५८१.७६ अब्ज डॉलर्सवर आला असल्याचे माहितीत स्पष्ट झाले आहे. डॉलरच्या संदर्भात, परकीय चलन मालमत्तांमध्ये परकीय चलन साठ्यात अस लेल्या युरो, पौंड आणि येन सारख्या गैर-अमेरिकन युनिट्सच्या वाढ किंवा अवमूल्यनाचा (Devaluation) परिणाम समाविष्ट आहे. आरबीआयच्या आठवड्यातील सोन्याचा साठा २.२४ अब्ज डॉलर्सने वाढून ९५.०२ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.विशेष रेखांकन हक्क (Special Drawings Rights SDR) ९० दशलक्ष डॉलर्सने घसरून १८.७९ अब्ज डॉलर्सवर आले आहेत असे बँकेने म्हटले. अहवाल आठवड्यात भारताची आयएमएफकडे असलेली राखीव ठेव (Reserve Deposi) $89 दशलक्षने कमी होऊन $4.67 अब्ज झाली, असे आकडेवारीवरून दिसून आले आहे.
रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात चलन बाजारातील अस्थिरता कमी करण्यासाठी काही विशिष्ट श्रेणींमध्ये हस्तक्षेप केल्याचेही म्हटले जाते.याव्यतिरिक्त,मध्यवर्ती बँकेने संपूर्ण जुलैमध्ये एकही डॉलर खरेदी केला नाही, जो गेल्या ११ वर्षांत पहिल्यांदाच झाला आहे. द रम्यान, सोन्याचा साठा आठवड्यात $२.२३८ अब्जने वाढून $९५.०१७ अब्ज झाला, असे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे.वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, सोने हे केंद्रीय बँकांच्या राखीव ठेवींमध्ये एक महत्त्वाचा घटक असतो.सुरक्षा,तर लता आणि परतावा यांच्या आधारे आरबीआयची ही तीन प्रमुख गुंतवणूक उद्दिष्टे आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) असलेली भारताची राखीव ठेव स्थिती देखील अहवाल आठवड्यात $८९ दशलक्षने कमी होऊन $४.६७३ अब्ज झाली आहे असे आरबी आ यच्या बुलेटिनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया - बुलेटिन वीकली स्टॅटिस्टिकल सप्लिमेंट डेटानुसार, २६ सप्टेंबर रोजी आठवड्याच्या अखेरीस भारताचा सोन्याचा साठा २.२३८ अब्ज डॉलर्सने वाढून ९५.०१७ अब्ज डॉलर्सवर पोहोचला. भूराजकीय अनिश्चितता, जकातींवरील संकटे (Tariff Hike), द्विपक्षीय तणाव आणि फेड दर कपातीमुळे केंद्रीय बँकांनी सोने खरेदी करण्यावर कडक कारवाई केल्यामुळे सोन्याच्या साठ्यात वाढ झाली असल्याचे आरबीआयने नमूद केले आहे.
भारताच्या परकीय चलन साठ्यात आठवड्याला २.३३ अब्ज डॉलर्सची घट झाली, जी ७००.२ अब्ज डॉलर्सवर आली. रुपयाच्या बाबतीत, चलनातील चढउतार(Volatility) मुळे साठा ६२.१२ लाख कोटी रुपयांवर पोहोचला. ही घसरण प्रामुख्याने परकीय चलन मा लमत्तेत घट झाल्यामुळे झाली, जी ४.३९ अब्ज डॉलर्सने कमी होऊन ५८१.८ अब्ज डॉलर्सवर आली आहे. माहितीनुसार, विशेष रेखांकन अधिकार (SDRs) आणि IMF मधील भारताच्या राखीव स्थितीतही आठवड्यात किरकोळ घट झाली.