
सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांचे बंधू आणि शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला झाला. महेश चिवटे यांना बेदम मारहाण झाली. स्थानिक पातळीवरील राजकीय कलहातून ही घटना घडल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
करमाळ्यातील हिवरवाडी गावात सकाळी शेतात कामासाठी गेले असताना महेश चिवटे यांच्यावर हल्ला झाला. महेश चिवटे जखमी झाले आहेत. तातडीने केलेल्या उपचारांमुळे आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.