Friday, October 3, 2025

अॅक्शन चित्रपटाद्वारे हॉलिवूड डेब्यू करणार टायगर श्रॉफ

अॅक्शन चित्रपटाद्वारे हॉलिवूड डेब्यू करणार टायगर श्रॉफ
अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच हॉलिवूड चित्रपटात दिसू शकतो. त्याचा पहिला चित्रपट एक जागतिक अॅक्शन थ्रिलर असेल. या चित्रपटात तो हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सिल्वेस्टर स्टॅलोन आणि थाई मार्शल आर्ट्स स्टार टोनी जा यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अमेझॉन एमजीएम एक महत्त्वाकांक्षी संपूर्ण जगभर चालणारा प्रकल्प तयार करण्यासाठी चर्चा करत आहे ज्यामध्ये हे तीन अॅक्शन स्टार पहिल्यांदाच एकत्र येतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा एक जागतिक प्रकल्प आहे आणि तो अनेक भाषांमध्ये बनवण्याविषयी चर्चा केली जात आहे. सूत्रांनी असेही सांगितले की, टायगर, सिल्वेस्टर स्टॅलोन आणि टोनी जा यांच्याशी चर्चेचा पहिला टप्पा आधीच पार पडला आहे. चित्रपटाच्या शीर्षकाबाबत चर्चा सुरू आहे; परंतु असे म्हटले जात आहे की चित्रपटाचे नाव भारतीय असेल. टायगर श्रॉफ त्याचा आदर्श सिल्वेस्टर स्टॅलोनसोबत अशा संपूर्ण जगातल्या अॅक्शन प्रोजेक्टमध्ये काम करण्यास उत्सुक आहे. २०१७ मध्ये टायगरने त्याच्या आदर्श सिल्वेस्टर स्टॅलोनच्या क्लासिक चित्रपट ‘रॅम्बो’च्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्याची पुष्टी केली होती. तथापि, तो चित्रपट नंतर कधीच प्रत्यक्षात आला नाही. सिल्वेस्टर स्टॅलोनने यापूर्वी २००९ मध्ये आलेल्या अक्षय कुमार आणि करिना कपूर स्टारर ‘कंबख्त इश्क’मध्ये एक छोटीशी भूमिका केली होती.
Comments
Add Comment