
दशावतार हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली छप्प्पर फाड कमाई करत आला आहे. तब्ब्ल तीन आठवडयांनी सुद्धा प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे. रिलीज होऊन २१ दिवसांनी सुद्धा थिएटर फुल्ल होताना दिसून येतात. फक्त २१ दिवसात प्रचंड मोठ्या प्रमाणात कमाई करणारा हा चित्रपट आहे. दशावतारची तीन आठवड्यांची कमाई ऐकून तुम्ही थक्कच व्हाल.
दशावतारची "इतकी" कमाई...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार द्शावतारच्या २० दिवसापर्यन्तची कमाई २१. ७५ कोटीहून अधीक झाली आहे असे कळते. हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा "मराठी चित्रपट" ठरला आहे. या चित्रपटाने २०२५ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपटाचा मान मिळवला आहे.

दशावतार समोरची आव्हाने
"कांतारा चॅप्टर १ " आणि "सनी संसकारी कि तुलसी कुमारी" हे दोन मोठे बजेट असलेले चित्रपट आहेत. हे दोन चित्रपट दशावतार समोर आव्हान ठरणार आहेत.
दशावतारची ही कमाई बघून दशावताराच्या टीमसाठी हि अभिमानाची गोष्ट आहे. "बाबुली मेस्त्री" ही दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली हि भूमिका लोकांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे.
कोकणातील संस्कृती, परंपरा, आणि सत्य स्थितीवर हा गूढ आणि थ्रिलर चित्रपट आधारित आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकवर्ग चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहे. हि मराठी सिनेसृष्टीला प्रचंड अभिमानाची बाब ठरली आहे.