Friday, October 3, 2025

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्यात नामांतराच्या मुद्यावर चर्चा झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.

भूमिपुत्रांना विमानतळावर नोकऱ्या मिळाव्या यासाठी महामोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली आहे. या मोर्चात मनसे, शेकाप यांच्या व्यतिरिक्त राज्यातले विरोधी पक्ष सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते.

नियोजित आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी रविवारी अलिबागमध्ये जयंत पाटील यांच्या निवासस्थानी आणखी एक बैठक होणार आहे. या बैठकीला कोणकोणत्या पक्षाचे प्रतिनिधी येतात यावरुन मोर्चा किती मोठा असेल याचा अंदाज येईल.

Comments
Add Comment