Friday, October 3, 2025

'मनाचे श्लोक' टीमकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

'मनाचे श्लोक' टीमकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
सध्या महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे सोलापूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाचा सर्वात जास्त फटका शेतकरी बांधवांना बसला आहे. जोमाने वाढलेले पीक पाण्यात जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे बळीराजावर मोठं संकट आलं आहे. या सर्वात 'मनाचे श्लोक' चित्रपटाची टीमने मदतीचा हात पुढे केला आहे. नुकतंच 'मनाचे श्लोक' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्यात चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना अडीच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मराठी कलाकारही पुढे सरसावले आहेत. 'मनाचे श्लोक' चित्रपटाच्या टीम व्यतिरिक्त अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, अभिनेता श्रेयस राजे, अभिनेता प्रवीण तरडे आणि सोनू सूद हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आहेत.
Comments
Add Comment