Friday, October 3, 2025

महात्मा गांधींच्या पणतीचे ग्लॅमरच्या जगात वेगळे स्थान!

महात्मा गांधींच्या पणतीचे ग्लॅमरच्या जगात वेगळे स्थान!

महात्मा गांधी यांचे नाव संपूर्ण जग आदराने आणि श्रद्धेने लक्षात ठेवते. त्यांचे विचार, तत्त्वे आणि सत्य व अहिंसेचा मार्ग आजही प्रेरणास्रोत आहे. त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य भारतात नाही तर अमेरिकेत वेगळे जीवन जगत आहे. ही व्यक्ती आहे मेधा गांधी आणि ती महात्मा गांधीजींची पणती आहे.

मेधा महात्मा गांधींचे ज्येष्ठ पुत्र हरिलाल गांधी यांच्या वंशज आहेत. मेधा गांधी अमेरिकेतच वाढली. मेधा अमेरिकेत एक इन्फ्लुएन्सर कलाकार आहे. ती व्यवसायाने विनोदी लेखिका, निर्माती आणि गायिका आहे. तिने अमेरिकेत “डेव्ह अँड शो” आणि “मॅटी इन द मॉर्निंग शो”सारखे अनेक लोकप्रिय रेडिओ आणि टेलिव्हिजन कार्यक्रम तयार केले आहेत.

ती “एल्विश डुरान अँड द मॉर्निंग शो”ची होस्ट देखील आहे, जी अमेरिकेत खूप लोकप्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर जवळजवळ २,५०,००० फॉलोअर्स आहेत.

Comments
Add Comment