आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश


आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये बुडाले. यामधील दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर एका तरुणाला वाचवण्यात यश आले आहे. या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेपत्ता झालेल्या इतर तरुणांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी धाव घेतली असून ते बेपत्ता तरुणांचा शोध घेत आहेत.


आग्रा येथील खेरागड भागातील एक कुटुंब गुरुवारी विजयादशमीनिमित्त दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी उंटगन नदीत गेले होते. कुटुंबातील काही तरुण मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नदीत उतरले. अचानक त्यांचा तोल गेला आणि ६ तरुण नदीत बुडाले. या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. एका तरुणाला वाचवण्यात यश आले, तर इतर जणांचा शोध घेतला जात आहे.


या घटनेपूर्वी उत्तर प्रदेशच्या आझमगड येथे देखील अशीच घटना घडली. दुर्गा मातेच्या विसर्जनादरम्यान एका मुलाचा पाय घसरला व तो बेसो नदीमध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा छोटा भाऊ, काका व गावातील एका व्यक्तीने नदीमध्ये उडी मारली. हे सर्वजण नदीमध्ये बुडाले. नदीत बुडालेल्या या सर्वांना गावकऱ्यांनी वाचवले व सुरक्षित नदीतून बाहेर काढले. पण नदीत बुडून सीकू नावाच्या मुलाचा मृत्यू झाला. एका तासानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Comments
Add Comment

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

नव्या नियमांचा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडथळा नवी दिल्ली : कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि

‘अल्मोंट-कीड’ बालसिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’

औषधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह नवी दिल्ली : मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या सुरक्षिततेवर

Indore Truck Accident : मुंबई-आग्रा हायवेवर गाड्यांचा चेंदामेंदा! तीव्र उतारावर ट्रकचे नियंत्रण सुटले अन् सात गाड्या एकमेकांवर...

महू : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानपूर भेरू घाटात शनिवारी सकाळी सात वाहनांचा साखळी अपघात झाल्याची