
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. राष्ट्रीय चरित्र निर्माण, सामाजिक आणि सांस्कृतिक जागरूकता आणि समाजातील सर्वात शेवटच्या पायरीवरील माणसाचे पुनरूत्थान या मार्गावर शंभर वर्षं काम केले आणि अजूनही तो काम करतोच आहे. आज देशभरात संघाच्या ५५ हजार शाखा आहेत आणि कोणत्याही राजकीय वादात न पडण्याची त्यांची भूमिका आजपर्यंत राहिली आहे. भारतीय जनता पक्ष या पक्षाचा तो पैतृक आहे. म्हणजे भाजपचा तो पिता आहे. पण इतक्यावरच त्याचे कार्य संपत नाही. समाजातील तळागाळातील लोकांचे कल्याण आणि सामाजिक समरसता यात संघ स्वयंसेवक स्वतःला वाहून टाकतात. गेल्या शंभर वर्षांत संघापुढे अनेक आव्हाने उभी राहिली आणि त्यातून तावूनसुलाखून पण आपले चरित्र न गमावता संघ तसाच मजबूत उभा आहे. संघाच्या कार्यशैलीवर वाद करत असतात आणि संघावर आक्रमक शैलीत टीका करत असतात. पण त्यांच्या टीकेत कधीही तथ्य आढळले नाही. संघावर पंडित नेहरूंच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूनंतर काही वर्षे बंदी आणली होती. १९४७ मध्ये एकदा आणि स्वातंत्र्योत्तर काळात संघावर तीन वेळा बंदी घालण्यात आली होती. कारण काँग्रेस सरकारला संघ नकोसा वाटत होता. संघावर नेहरूंपासून ते गांधी परिवारापर्यंत अनेकांनी फॅसिस्ट संघटना असे अनेक आरोप केले आहेत. पण काँग्रेसच्या त्या दाव्यांना कधीही सिद्ध करण्यात आले नाही आणि ‘हाथी चले अपनी चाल’प्रमाणे संघ वाटचाल करतच राहिला. नथुराम गोडसे याने जेव्हा महात्मा गांधी यांची हत्या केली तेव्हा संघावर भारतीय सरकारने प्रथम बंदी आणली होती. नंतर इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस सरकारने संघावर बंदी आणली. पण संघावर कोणताच आरोप कधीही सिद्ध झाला नाही. भारतातील अल्पसंख्याक वर्गाला खूश करण्यासाठी काँग्रेस सरकारने संघाला नेहमीच टार्गेट केले होते. पण कधीही काँग्रेस सरकार ते सिद्ध करू शकले नाही.
मध्यंतरी तर केवळ संघाशी संबंधित नाही म्हणून सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना तसे लिहून देण्याची सक्ती केली होती. काँग्रेसचा हा संघ स्वयंसेवकांबद्दलचा द्वेष यात दिसून आला. संघाच्या नेत्यांवर असा आरोप नेहमीच लावला जातो की त्यांनी आपल्या मुख्यालयात कधीही स्वातंत्र्य उत्सव साजरा केला नाही. पण तो केवळ आरोप होता. संघाने भारताचे राष्ट्रीय आणि सामाजिक अभिसरण हे कार्य सातत्याने संघाने केले आहे. संघाची स्थापना २७ सप्टेंबर १९२५ रोजी झाली आणि आज बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. पण संघाची जाज्वल्य निष्ठा आणि तळागाळातील वर्गाचे उत्थान हे कार्य अहोरात्र सुरू आहे. संघाचा सर्वात नेहमीच वाद राहिला होता तो कम्युनिस्ट पक्षांशी नंतर काँग्रेसशी. पण संघ या सर्वांना पुरून उरला आणि आज तर तो सत्ताधारी झाला आहे. म्हणजे संघाचे पदाधिकारी प्रत्यक्षात सत्तेत नसतात. पण भाजपला सत्तेत आणण्यासाठी ते प्रचंड कष्ट करतात आणि त्याचे फल त्यांना मिळते. संघावर अनेक आरोप करण्यात आले तसेच त्यांना फॅसिस्ट म्हणून हिणवण्यात आले तसेच संघाच्या स्वयंसेवकांना टार्गेट करण्यात आले. बाबरी मशिदीचे पतन असो किंवा गांधी हत्या असो. या काळात संघाला टार्गेट करून बंदी घालण्यात आली. यावेळी काँग्रेसचेच सरकार होते. पण संघाने सर्व आव्हानांना तोड देत आज आपले सर्वोच्च स्थान पटकावले आहे.
संघ आज १०० वर्षं पूर्ण करत आहे. पण त्यांची पहिली शाखा नागपूरच्या मोहितेवाडा येथे भरवण्यात आली होती. आज त्या शाखेचा वटवृक्ष झाला आहे. आज संघाच्या जगभर शाखा आहेत आणि जगभर संघाचे स्वयंसेवक आहेत, तसेच संघात प्रत्यक्ष संबंधित नसले तरीही संघाप्रती सहानुभूती बाळगणारे आहेत. शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेला संघ नेहमीच टीकेच्या केंद्रस्थानी आहे. कधी त्याला फॅसिस्ट म्हणणे, तर कधी भारताचा स्वांतंत्र्यदिन साजरा केला नाही असे म्हणणे तसेच संघावर तर काँग्रेसने हिसाचार फैलावल्याचा आरोपही केला होता. पण यातील एकही आरोप सिद्ध होऊ शकला नाही आणि आज दिमाखात संघ शंभरावे वर्षं साजरे करत आहे. संघावर नेहमीच आरोप केला जातो की तो ब्राह्मण्यावादी संघटना आहे. पण संघाच्या शाखेत जा, कधीही तुम्हाला जातीभेद मानलेला दिसणार नाही. उलट संघाने समरसता शिबिरे भरवून समाजातील जातिभेद दूर केले आहे. किंबहुना तसे प्रयास केले आहेत. आज जग खूप जवळ आले आहे. त्यामुळे प्रत्येक संघटनेची आपली एक भूमिका घेणे आवश्यक आहे. ते कार्य संघ उत्कृष्टरीत्या पार पाडतो आहे असेच म्हणावे लागेल. जागतिक संदर्भ बाजूला ठेवून संघाला भारतापुरता विचार करून चालणार नाही आणि संघ ते करतो आहे. कारण हे ईश्वरदत्त कार्य आहे आणि ते पार पाडण्यासाठी संघ खंबीरपणे पाय रोवून उभा आहे. हेडगेवारांनी उभारलेल्या या शाखेचा एक वटवृक्ष झाला आहे आणि त्याची फळं भाजप ते संघाच्या अनेक शाखापर्यंत पोहोचली आहेत. आज शंभर वर्षांपूर्वी जग फारच बदलले आहे. अगदी शंभर वर्षांपूर्वीही जग होते तसेच ते राहिलेले नाही. महायुद्धानी जगाला बदलले तसेच आता होऊ घातलेल्या जागतिक संघर्षानेही जगापुढे नवीन आव्हानात्मक स्थिती उभी केली आहे. तिला तोंड कसे द्यायचे याचे उत्तर संघाकडेच आहे. जेव्हा संघाची स्थापना झाली तेव्हा फक्त हिंदू राष्ट्र म्हणून उभारणी करायची असे संघापुढे आव्हान होते. आज ते आव्हान कित्येक पटींनी वाढले आहे. त्यामुळे संघाची जबाबदारीही वाढली आहे. आज मितीला संघ ही प्रचंड सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ म्हणून समोर आली. अनेक आव्हाने परतवून सत्ता स्थापन केली, ती आपल्या अपत्याला म्हणजे भाजपला सत्तास्थानापर्यंत पोहोचवले आहे. पण एवढ्यापुरते संघाचे काम संपत नाही तर यापुढे सत्ता टिकवणे आणि काँग्रेसला नेस्तनाबूत करणे हे संघापुढचे आव्हान आहे. ही लढाई कधीही संपणार नाही. शंभर वर्षे हा तिच्या प्रवासातील एक पडाव आहे. यापुढेही संघाची वाटचाल अशीच चालू राहील यात काही शंका नाही. कारण नरेंद्र मोदी यांच्यासारखे पंतप्रधान भारताला लाभले आहेत.