Friday, October 24, 2025
Happy Diwali

८ ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार

८ ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार

मुंबई (प्रतिनिधी) : २९ सप्टेंबरपासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र २ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने मेघ गर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल. वादळी पावसाची सर्वांत अधिक शक्यता विदर्भात राहील. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल व ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. पुढच्या काही दिवसांतच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यातील ग्रामीण व शहरी भागात धुवांधार बरसल्यानंतर काही काळ विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा पुनरागमन करत असून पूर्व विदर्भाकडून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबईत ढगाळ आकाशासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

Comments
Add Comment