
अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजी करत आहे.
पहिल्या दिवसाच्या सुरूवातीलाच भारतीय गोलंदाजांचा कहर पाहायला मिळत आहे. लंचपर्यंत वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. त्यांचे ५ विकेट पडले आहेत. वेस्ट इंडिजने अजून १०० धावांचा टप्पाही पार केलेला नाही. वेस्ट इंडिजच्या ९० धावा झाल्या असून ५ विकेट पडल्या आहेत. मोहम्मद सिराजने ३ विकेट मिळवल्या आहेत.
पहिल्या डावात वेस्ट इंडिजची सुरूवात चांगली झाली नाही. १२ धावांवर वेस्ट इंडिजला पहिला झटका बसला. चंद्रपॉल ० धावांवर मोहम्मद सिराजच्या बॉलवर बाद झाला. यानंतर दुसरा सलामी फलंदाज जॉन कॅम्पबेल ८ धावांवर जसप्रीत बुमराहच्या बॉलवर बाद झाला. यानंतर सिराजचा कहर पाहायला मिळाला. त्याने आणखी दोन विकेट मिळवल्या. लंचच्या आधी कुलदीप यादवने वेस्ट इंडिजला पाचवा झटका दिला. शाय होपने आपली विकेट गमावली.
भारताचे प्लेईंग ११ - यशस्वी जायसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल(कर्णधार), ध्रुव जुरेल(विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरहा आणि मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडिजचे प्लेईंग ११ - तेजनारायण चंद्रपॉल, जॉन कॅम्पबेल, एलिक अथानाज, ब्रँडन किंग, शाय होप(विकेटकीपर), रोस्टन चेज(कर्णधार), जस्टिन ग्रीव्स, जोमेल वॉरिकन, खैरी पियरे, जोहान लेन, जेडन सील्स.