
अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरूवात झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना रंगत आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेईंग ११मध्ये कुलदीप यादवला सामील केले आहे. कुलदीप इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांच्या प्लेईंग ११मधून बाहेर होता. प्रसिद्ध कृष्णा, देवदत्त पड्डिकल, एन जगदीशन आणि अक्षऱ पटेल यांना अंतिम ११ मध्ये स्थान मिळालेले नाही.
भारताचे प्लेईंग ११ - यशस्वी जायसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल(कर्णधार), ध्रुव जुरेल(विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरहा आणि मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडिजचे प्लेईंग ११ - तेजनारायण चंद्रपॉल, जॉन कॅम्पबेल, एलिक अथानाज, ब्रँडन किंग, शाय होप(विकेटकीपर), रोस्टन चेज(कर्णधार), जस्टिन ग्रीव्स, जोमेल वॉरिकन, खैरी पियरे, जोहान लेन, जेडन सील्स.