Thursday, October 2, 2025

IND vs PAK : महिला क्रिकेट संघही पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नाही

IND vs PAK : महिला क्रिकेट संघही पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नाही

नवी दिल्ली : दुबईतील आशिया कप दरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघाप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे होणाऱ्या महिला विश्वचषक सामन्यादरम्यान हरमनप्रीत कौर आणि तिचा संघही पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नाही. भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंध सर्वात वाईट स्थितीत आहेत. बोर्ड सरकारच्या सूचनांचे पालन करेल आणि नाणेफेकीच्यावेळी हस्तांदोलन होणार नाही. मॅच रेफ्रीशी फोटोशूट होणार नाही आणि सामन्याच्या शेवटी हस्तांदोलन करण्यात येणार नाही.महिला संघही पुरुष संघाने स्वीकारलेल्या धोरणाचे पालन करेल. कोलंबोमधील टॉसवरही बारकाईने लक्ष ठेवले जाईल. हे एखाद्या माजी क्रिकेटपटू किंवा तटस्थ देशातील तज्ञाकडून केले जाईल अशी अपेक्षा आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने डीएलएस पद्धतीने श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव केला. ४७ षटकांच्या या सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर २७० धावांचे लक्ष्य ठेवले. पण श्रीलंकेचा संघ ४५.४ षटकांत २११ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय महिला संघाने हा विश्वचषक कधीही जिंकलेला नाही आणि अशा परिस्थितीत हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघाला त्यांच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान असणार आहे.

Comments
Add Comment