Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

राज्यभरात आज दसरा मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे, नेस्कोमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे, तर बीडमध्ये पंकजा मुंडेंचा मेळावा

राज्यभरात आज दसरा मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे, नेस्कोमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे, तर बीडमध्ये पंकजा मुंडेंचा मेळावा

मुंबई : राज्यभरात आज विविध राजकीय नेत्यांचे दसरा मेळावे होत आहेत.  यंदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यातील संघर्षामुळे दोन स्वतंत्र मेळावे होणार आहेत. याशिवाय बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पारंपारिक मेळावाही होत असल्याने राज्याचे लक्ष या तिन्ही कार्यक्रमांकडे लागले आहे.मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील नारायण गडावर दसरा मेळाव्यात त्यांच्या मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत. याचसोबत नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचाही दसरा मेळावा होणार आहे.

राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे (पूरग्रस्त परिस्थिती) मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे या मेळाव्यांमध्ये राजकीय टीका-टिप्पणीसह पूरग्रस्तांना मदत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे मुद्दे केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), मुंबई येथे सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरू होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आणि शिवसेनेच्या ५९ वर्षांच्या परंपरेवर जोर देऊन शिवसैनिकांना भावनिक साद घालतील. सत्ताधारी भाजपवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. स्वतःला बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे खरे वारसदार म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील. गेल्या वर्षभरातील सरकारच्या विकासकामांचा लेखाजोखा मांडतील. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर सरकारने केलेली तातडीची मदत आणि भविष्यातील योजनांची घोषणा करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षावर टीका करून, त्यांनी सत्ता गमावल्याची कारणे आणि त्यांच्या नेतृत्वातील त्रुटींवर बोट ठेवतील.

पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा बीडच्या सावरगाव घाट येथे होणार आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांची परंपरा पुढे नेणाऱ्या पंकजा मुंडे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी या मेळाव्याला मोठी गर्दी केली जाते.

यंदाच्या दसरा मेळाव्यांवर अतिवृष्टी आणि पावसामुळे काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पावसाचे मोठे संकट असल्याने राजकीय नेत्यांकडून पूरग्रस्त भागांना मदतीची घोषणा होण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment