Wednesday, October 1, 2025

'व्हिटॅमिन डी'ची कमतरता, किशोरवयीन मुलांमध्ये अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका

'व्हिटॅमिन डी'ची कमतरता, किशोरवयीन मुलांमध्ये अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका

मुंबई : भारतातील किशोरवयीन मुलानंमध्ये 'व्हिटॅमिन डी' आणि 'झिंक'ची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसते. या कमतरतेमुळे लहान वयात मुलांना गंभीर आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. चिल्ड्रन इंडिया या स्वयंसेवी संस्थेने तयार केलेल्या अहवालानुसार किशोरवयीन मुलांमध्ये पोषक आहाराअभावी आजारांचे प्रमाण वाढत आहे. झिंक आणि व्हिटॅमिन डी यांच्या कमतरतेची टक्केवारी काढली तर १० ते १९ वयोगटातील २४ टक्के मुलांना व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे. तर ३२ टक्के मुलांना झिंकची कमतरता आहे.

ग्रामीण भागातील बालमृत्यूदर (टक्के)

१. ग्रामीण भागात - २८ २. शहरी भागात - १८ ३. छत्तीसगड आणि मध्यप्रदेश - ३७ ४. केरळ - ५

किशोरवयीन मुलांचे आरोग्याचे धोके

चिल्ड्रन इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालानुसार किशोरवयीन मुलांमध्ये अनेक गंभीर आजार दिसून आले. किशोरवयीन मुलांपैकी १०. ४ टक्के मधुमेहपूर्व स्थितीत आहेत. तर ४. ९ टक्के मुलांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. तसेच ४. ९ टक्के मुलांमध्ये कोलेस्टेरॉलच्या समस्या आढळली आहे. चिंतेची बाब म्हणजे ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये ट्रयग्लिसराईज्डचे प्रमाण अधिक आढळले आहे. यामुळे या मुलांना भविष्यात हृदयविकाराचा त्रास होण्याचा धोका आहे.

Comments
Add Comment