मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रातील सुरूवातीलाच सेन्सेक्स ११९.५६ अंकाने व निफ्टी ४२.१५ अंकाने उसळला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशाकांतही १०० अंकाहून अधिक वाढ झाल्या ने आज सकाळच्या सत्रात फंडांमेंटल टेक्निकल सपोर्ट कायम आहे. मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्येही सकाळच्या सुरूवातीच्या कलात वाढ झाल्याने आज गुंतवणूकदारांचा कल मात्र सकारात्मक दिसला. सुरूवातीला आयसीआयसीआय बँक, अँक्सिस बँक, टाटा टेक्नॉलॉजी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन या दिग्गज शेअर्समध्ये वाढ झाली असून सकाळी सुरूवातीला वोक्हार्ट, गोदरेज अँग्रोवेट, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस अशा हेवीवेट शेअर्समध्ये घस रण झाली आहे. सकाळी निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील (Nifty Sectoral Indices) मध्ये सकाळी सर्वाधिक वाढ मिडिया (१.८३%), रिअल्टी (१.०७%), हेल्थकेअर (१.१५%) निर्देशांकात झाली आहे. तर किरकोळ घसरण केवळ फायनांशियल सर्व्हिसेस एक्सबँक (० .०१%) निर्देशांकात झाली.
प्रामुख्याने युएस बाजारातील आर्थिक संमिश्र परिस्थिती तर दुसरीकडे युएसमधील राजकीय अस्थिरता या कारणामुळे आगामी लक्ष युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरावरील जेरोमी पॉवेल यांच्या भाष्याकडे गुंतवणूकदारांचे लागले आहे. प्रामुख्याने युएसमधील अपेक्षे हून अधिक जीडीपी आकडेवारी आल्यानंतर व अनपेक्षित पीसीई आकडेवारीत घसरण व महागाईत वाढ झाल्यानंतर युएस बाजारात संदिग्धता कायम आहे. आगामी कामगार व रोजगार आकडेवारीनंतर शेअर बाजारात फेरबदल अपेक्षित आहे. भारतीय बाजारा त युएस टॅरिफ वाढीचे परिणाम व फार्मा उत्पादनावरील १००% टॅरिफ वाढ, एच१बी व्हिसावर शुल्कवाढ यांचे पडसाद उमटल्याने सलग आठव्यांदा काल शेअर बाजारात घसरण झाली. पहाटेच गिफ्ट निफ्टीसह प्री ओपन सत्रातही बाजाराचा कल घसरणीकडे हो ता. मात्र निदान सुरूवातीच्या कलात आरबीआयच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर वाढीकडे झुकला आहे.
आज शेअर बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचे सेल ऑफ कायम राहिल्यास नफा बुकिंग व कंसोलिडेशन याची पुनरावृत्ती होईल का अखेरच्या सत्रात बाजार बाजी पलटवेल याकडे विशेषतः घरगुती गुंतवणूकदारांचे (Domestic Investors) लक्ष लाग ले आहे.मात्र सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आशियाई बाजारातील सेंट्रल बँक ऑफ जपानने जाहीर केलेल्या तिसऱ्या तिमाहीचा टनकान अहवाल (Tunkan Survey),भारतातील आरबीआयच्या आजच्या वित्तीय पतधोरण समितीचा रेपो दराचा निकाल हे दोन्ही मुद्दे आजच्या भारतीय व आशियाई बाजारातील परिणामांसाठी निर्णायक ठरू शकतात. आरबीआय मागील बैठकीप्रमाणे 'तटस्थ ' (Neutral) भूमिका (Stance) घेते का आपला निष्कर्ष अकोमोडेटिव (Accommodative) घेते याकडे भारतीय अर्थव्यवस्थेची पुढील रूपरेषा स्पष्ट होईल. एकीकडे जीएसटी कपात केल्यानंतर बाजारातील तरलता (Liquidity) वाढण्याची शक्यता आहे याखेरीज वैयक्तिक उपभोगात (Personal Consumption) मध्ये अतिरिक्त वाढ सातत्याने होत असताना पुढील तिमाहीत ग्राहक महागाई चा (Consumer Inflation) धोकाही कायम आहे. त्यामुळेच एका ठिकाणी महागाई, तरलता यांचे संतुलन राखणे आरबीआयसाठी महत्वाचे असणार आहे. अशातच आजच्या निष्कर्षावर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे लक्षही लागले आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ सनटिव्ही नेटवर्क (५.०४%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (४.९४%), हुडको (३.८९%), एनएमडीसी स्टील (३.७४%), पेज इंडस्ट्रीज (२.७५%), सनफार्मा इंडस्ट्रीज (२.२६%), लुपिन (२.७५%), एथर एनर्जी (२.५८%), न्यूजेन सॉ फ्टवेअर (२.१७%), गोदरेज प्रोपर्टी (१.९७%) बजाज ऑटो (१.५३%) समभागात झाली आहे.सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण वोक्हार्ट (२.७६%), केबीसी इंटरनॅशनल (२.६८%), मेट्रोपॉलिस हेल्थ (२.२६%), चोला फायनांशियल (२.२२%), आरबीएल बँक (१ .९५%), स्विगी (१.४२%), बिकाजी फूडस (१.६६%), भारती हेक्साकॉम (१.४५%), आर आर केबल्स (१.३८%), आयटीसी हॉटेल्स (१.२२%), गोदरेज इंडस्ट्रीज (१.१९%), बजाज फायनान्स (१.०१%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील सुरूवातीच्या परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,' आज बाजाराचे लक्ष चलनविषयक धोरणावर असेल, विशेषतः धोरणा ची भाषा आणि संदेश आणि आरबीआय गव्हर्नर यांच्या टिप्पण्यांवर. बँकिंग स्टॉक्स लक्ष केंद्रीत असतील कारण या टप्प्यावर व्याजदर कपात त्यांच्या एनआयएमवर परिणाम करेल आणि शेअरच्या किमतींवर परिणाम करेल. एमपीसीने थांबवलेला विराम - बहुधा परिस्थिती - बँकिंग स्टॉक्सना लवचिकता (Flexibility) देईल.एफआयआयच्या सततच्या विक्रीमुळे बाजारात कमकुवतपणा आणि घसरण सुरूच आहे. जवळचा काळ गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक ठरू शकतो. अनुभव सांगतो की असा निराशाजनक काळ दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आदर्श आहे. उच्च दर्जाच्या लार्जकॅप शेअर्समध्ये पद्धतशीर गुंतवणूक ही आताची रणनीती असली पाहिजे आणि संयम हा दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचा गुरुकिल्ली असेल.'
आजच्या बाजारातील सुरूवातीच्या टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'जरी निफ्टी दिवसाच्या नीचांकी पातळीजवळ बंद झाला असला तरी, ऑसि लेटर अधिक चढउतारांसाठी अनुकूल दिसत आहेत. यामुळे आपल्याला २४९७० किंवा २५०५० पातळी वरचे उद्दिष्ट टिकवून ठेवण्याची प्रेरणा मिळते. दरम्यान, २४७२० आणि २४८०० पातळी हे वरचे आव्हान राहिले आहेत, तर जवळचे आधार २४५०० आणि २४ ३३६ पातळीवर आहेत.'