शिंदेंचं एक पाऊल मागे! निवडणुकीत शिवसेना धाकटा भाऊ होणार, शिंदेंना कमी जागा मिळणार?

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डावपेच आणि रणनीतीमुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा बॅकफूटवर गेलेत. जागावाटपात शिवसेनेला पुन्हा एकदा माघार घ्यावी लागली आहे, तर भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसत आहे.


मुंबईत शिवसेनेचा जन्म झाला. तिथेच तिची पाळमुळं रुजली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळात शिवसेना मुंबई महापालिकेत नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत होती. मात्र २०२२ च्या बंडानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सातत्याने माघार घ्यावी लागतेय. लोकसभा, विधानसभा आणि आता मुंबई महापालिका निवडणुकीतही जागावाटपामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक पाऊल मागे घेताना दिसताहेत.


?si=R5YoTwOx00SRXlwc

लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला फक्त १५ जागा मिळाल्या. रत्नागिरी-सिंधुदुर्गसारख्या जागा नारायण राणेंना सोडाव्या लागल्या. नाशिक, ठाण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत करावी लागली, तर हिंगोली, यवतमाळ-वाशिममध्ये उमेदवार मागे घ्यावे लागले. विधानसभेत तर परिस्थिती आणखी बिकट झाली. भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला केवळ ८७ जागा दिल्या, ज्यात अनेक ठिकाणी भाजपच्या आयात नेत्यांना उमेदवारी द्यावी लागली. कुडाळ-मालवण, कन्नड, अंधेरी पूर्व, बोईसर, भिवंडी, मुंबादेवी, पालघर, संगमनेर, करमाळा या जागांवर शिंदेंना भाजपच्या नेत्यांना सामावून घ्यावं लागलं.


मुंबई महापालिका ही शिवसेनेची प्रतिष्ठा आहे. पण यंदा प्रथमच भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. शिंदेंनी जागावाटपात माघार घेतलीय. जास्त जागा लढवण्यापेक्षा विजय महत्त्वाचा, ही त्यांची भूमिका आहे. ही भूमिकाच शिवसेनेची माघार स्पष्ट करतेय. विधानसभेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने १० जागा जिंकल्या, शिंदेंच्या वाट्याला फक्त ६ आल्या तर भाजपाने १५ जागांसह क्रमांक एकचा पक्ष अर्थात मोठा भाऊ म्हणून स्वतःला सिद्ध केलं.


मोठा भाऊ या नात्याने मुंबई महानगरपालिकेच्या जास्तीत जास्त जागांवर दावा करणं ही भाजपाची खेळी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रणनीती आहे. विधानसभेतल्या भरघोस यशानंतर भाजपा बहुमताच्या जवळ पोहोचलाय. त्यामुळे मित्रपक्षांवरचं अवलंबित्व कमी झालंय. मुंबईत महायुतीत लढू असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं तरी त्यांनी जागावाटपात आक्रमक पवित्रा घेतलाय. भाजप स्वतःच्या ताकदीच्या जागा राखत आहे, तर शिंदेंना कमी जागांवर समाधान मानावं लागतंय. त्यातच ठाकरे बंधूंची संभाव्य युती शिंदेंसाठी धोक्याची घंटा ठरणारी आहे. युती झालीच तर त्याचा फटका शिंदेंच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.


मुंबई महापालिकेत २२७ जागा आहेत. आतापर्यंतच्या ट्रेंड पाहिल्यास भाजपा १२०-१४० जागा लढवेल, तर शिंदेंना ६० ते ८० जागांवर समाधान मानावं लागेल. ठाकरे बंधूंची युती झाल्यास शिंदेंच्या जागा ५० पर्यंत खाली येऊ शकतात. शिंदेंचा स्ट्राईक रेट वाढवण्याचा प्रयत्न आहे, पण भाजपच्या दबावाखाली ते यशस्वी होईल का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिंदेंच्या माघारीमुळे त्यांच्या पक्षाची ओळख आणि कार्यकर्त्यांचं मनोधैर्य कमी होतंय, अशी चर्चा सुरू झालीय. ही माघार अपरिहार्य आहे की गोची? याचं उत्तर मुंबईचे मतदार देतील.


मुंबई महानगरपालिकेवर भगवाच फडकेल असा विश्वास जरी शिंदेंनी व्यक्त केला तरी आव्हानं मोठं आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही केवळ जागावाटपाची लढाई नाही, तर शिवसेनेच्या अस्तित्वाची आणि भाजपच्या वर्चस्वाची लढाई आहे. दोन्ही निवडणुकीतला जागावाटपातला उतरता क्रम पाहता शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करावी लागेल. कारण ते स्वतंत्रपणे लढू शकत नाहीत. त्यामुळे भाजपच्या रणनीतीसमोर त्यांचा टिकाव लागेल का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Comments
Add Comment

पाच महिन्यांचा छळ आणि अखेर दुर्दैवी TragicEndशेवट; डॉक्टर तरुणी प्रकरणाची A टू Z कहाणी उघड

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिस आणि राजकीय दबावाला कंटाळून आत्महत्या केल्याने

मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरची हत्या, पत्नीला अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि

पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असलेला बाबाराव भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद

Maharashtra Rain Updates : पावसाचा जोर कायम! आज कुठे-कुठे कोसळणार वादळी पाऊस? २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान हवामान खात्याचा मोठा इशारा

मुंबई : सध्या दिवसभर जाणवणाऱ्या 'ऑक्टोबर हीट' (October Heat) मुळे नागरिक हैराण झाले असून, राज्यात उकाडा चांगलाच वाढला आहे.

Phaltan Doctor death case : ब्रेकिंग! फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकर अखेर अटक

सातारा : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरच्या आत्महत्या (Suicide) प्रकरणात आता एक

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच