
मोहित सोमण:आज अखेर आठ दिवसांच्या घसरणीला खिळ लावण्यात शेअर बाजारात आरबीआयचा निर्णय महत्वपूर्ण ठरला आहे. आज आरबीआयच्या वित्तीय पतधोरण समिती (Monetary Policy Committee MPC) ने आपला रेपो दर ५.५०% स्थिर ठेव ण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेअर बाजाराला गुंतवणूकदारांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे शेअर बाजाराने 'रॉकेट' उसळली घेतल्याने सेन्सेक्स ७१५.६९ व निफ्टी २२५.२० अंकांने उसळला. त्यामुळे सेन्सेक्स पातळी ८०९८३.३१ पातळीवर व निफ्टी ५० हा नि र्देशांक २४८३६.३० पातळीवर स्थिरावला आहे. विशेषतः आज मोठी रॅली सेन्सेक्स बँक (८८८.२८), बँक निफ्टी (७१२.१०) अंकाने बँक निर्देशांकात झाल्याने बँक शेअर्सने आज मोठी कामगिरी केली.आरबीआय आता आर्थिक वर्ष २६ मध्ये ६.५% ऐवजी ६.८% आ र्थिक वाढ अपेक्षित करते, ग्राहक महागाईचा दर ३.१% ऐवजी २.६% राहण्याचा अंदाज व्यक्त केला असल्याने घरगुती गुंतवणूकदारासह आज आशियाई व जागतिक पातळीवरील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) बाजारात गुंतवणूक टिकवली असल्या ची शक्यता आहे.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) मध्ये अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ खाजगी बँक (१.९७%),रिअल्टी (१.१०%), फार्मा (१.३०%),मिडिया (३.९७%) फायनांशियल सर्विसेस २५/५० (१.३३%), मिड स्मॉल हेल्थकेअर (१.११%),मिडस्मॉल आ यटी टेलिकॉम (१.८४%) निर्देशांकात झाल्यानेही आज बाजाराला मोठी सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली. विशेष उल्लेख म्हणजे भारतीय अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा ७.३१% घसरल्यानंतर आज बाजाराला रॅलीपासून रोखणे परदेशी सं स्थात्मक गुंतवणूकदारांसाठीही कठीण झाले.
यापूर्वी केंद्रीय बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले होते की देशाचा आर्थिक विस्तार मजबूत आहे परंतु जवळपास ८% पेक्षा कमी असू शकतो. याशिवाय आरबीआयने आपला 'तटस्थ' (Netural) स्टान्स (भूमि का) कायम राखल्याने आरबीआयने जागति क अस्थिरतेच्या काळात सावधगिरी बाळगल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः बँकेने रेपो दरासह 'MSF', 'SDF' दर ही स्थिर ठेवले होते.विशेषतः या बैठकीत रेपो दरासह बँकिंग क्षेत्रातील परिवर्तनाकडे आरबीआयने भर दिला. त्यांनी वित्तीय क्षेत्रासाठी २२ उपाययोजना जाहीर केल्या, त्यापैकी बहुतेकांचा उद्देश बँकिंग व्यवस्थेतील कर्ज प्रवाहाला मदत करणे हा होता. एकाग्र कर्जप्रवाहाचा धोका कमी करण्यासाठी, मोठ्या कंपन्यांना बँक कर्ज देण्यास मर्यादित करणारी २०१६ ची चौकट रद्द करण्याचा प्रस्ताव आरबीआयने ठेवला होता जो व्यावसायिक बँकांना मोठ्या व्यवसायांना अधिक कर्ज देण्यास सक्षम करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बदल होता. आयपीओ वित्तपुरवठ्यावरील मर्यादा प्रति व्यक्ती १० लाख रुपयांवरून २५ लाख रुपयांपर्यंत वाढवल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हे सकारात्मक पाऊल होते. खासकरुन व्यापक निर्देशांकांमध्ये निफ्टी मिडकॅप १०० आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० अनुक्रमे ०.९% आणि १.०% वाढ झाल्याने किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साही वातावरण असल्याचे यातून नमूद झाले.
अखेरच्या सत्रात एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, अँक्सिस बँक, इन्फोसिस, विप्रो या हेवी वेट शेअरमध्ये वाढ झाल्याने बाजारातील फंडामेंटलमध्ये मजबूत साथ मिळाली. तर दुसरीकडे बजाज होल्डिंग्स, बजाज फायनान्स, बजाज ऑटो, भारती एअरटेल, मारुती सुझुकी अशा हेवीवेट शेअर्समध्ये झाल्याने बाजारातील रॅली मर्यादित झाली आहे. आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात बहुतांश निर्देशांकात वाढ झाली असून सुरूवातीच्या कलात युरो पियन बाजारातील तिन्ही बाजारात वाढ झाली असून युएस बाजारात तीनपैकी दोन बाजारात वाढ झाली आहे.युएस बाजारातील गुंतवणूकदार पीसीई (Personal Consumption Expenditure PCE) नंतर आता आगामी कामगार व रोजगार आकडेवारीकडे ल क्ष केंद्रीत करत असताना युएस सरकार कर्मचारी कपातीचा (US Government Shutdown) निर्णय झाला असल्याने अमेरिकेतील ट्रेझरी व अर्थव्यवस्थेतील दबाव जाणवत आहे. त्यामुळेज आजही कमोडिटीत दबाव पातळी निर्माण झाल्याने सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ सनटिव्ही नेटवर्क (१५.१८%), नेटवेब टेक्नॉलॉजी (११.३४%), ए आय ए इंजिनिअरिंग (६.३७%), टाटा मोटर्स (५.६१%), एनएमडीसी स्टील (५.४८%), अदानी पॉवर (५.४३%), सम्मान कॅपिटल (५.४२%), श्रीराम फायनान्स (५.२९%), वोडाफोन आयडिया (४.८०%), पिरामल फार्मा (४.१२%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (४.०८%), हुडको (३.९५%), अदानी ग्रीन (३.६९%) समभागात वाढ झाली आहे.आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण डिलिव्हरी (३.४७%), एनएलसी इंडिया (२.९०%), आयटीसी हॉटेल्स (२.५६%), एचपीसीएल (२.०८%), होडांई मोटर्स (१.८३%), गोदरेज कंज्यूमर (१.५७%), स्विगी (१.२३%), बजाज फायनान्स (१.१२%), एसबीआय (०.९६%), बजाज ऑटो (०.६०%) समभागात झाली आहे.
आजच्या दिवसभरातील शेअर बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' भारतीय शेअर बाजाराने आज व्यापक पातळीवर तेजी नोंदवली, आरबीआयच्या धोर णात्मक निर्णयामुळे अपेक्षांशी सुसंगत होते परंतु जूनपेक्षा अधिक रचनात्मक सूर होता, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांना चालना मिळाली. भारताच्या जीडीपी वाढीच्या अंदाजात ६.५% वरून ६.८% पर्यंत वाढ करण्याच्या सुधारणेसह, त्यांच्या उदासीन भूमिके मुळे आत्मविश्वास वाढला. कर्ज देणे सुलभ करण्यासाठी पाच लक्ष्यित उपाययोजनांमधून अतिरिक्त पाठिंबा मिळाला, ज्यामध्ये भांडवली बाजारातील एक्सपोजर नियम शिथिल करणे आणि पायाभूत सुविधांसाठी वाढीव वित्तपुरवठा यांचा समावेश होता. बँकिंग आ णि ग्राहक समभागांमुळे नफा झाला, तर ऑटो चांगल्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर वाढले. एकूणच, तेजी सुधारत असलेल्या भावना दर्शवते आणि बाजाराच्या दिशेने संभाव्य बदलाच्या सुरुवातीच्या चिन्हे दर्शवते.'
आजच्या बाजारातील रुपयांच्या हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'आरबीआयने दर अपरिवर्तित ठेवले परंतु जागतिक पातळीवर रुपया स्थिरता राखण्यावर आपले लक्ष केंद्रित केल्यामुळे रुपया ०.१७ ने वाढून ८८.६७ वर पोहोचला, जो ०.२०% वाढला. केंद्रीय बँकेने आवश्यकतेनुसार रुपयावर योग्य पावले उचलण्याची तयारी दर्शविली, तसेच निरोगी आणि तरल बँकिंग प्रणाली सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनांची रूपरेषा देखी ल दिली. ऑगस्ट एमपीसीपासून एलएएफ दैनिक अधिशेष सरासरी ₹२.१ ट्रिलियन आणि सीआरआर कपात आणि सरकारी खर्चाद्वारे येणाऱ्या तरलता समर्थनामुळे, भावना सुधारली. आरबीआयने द्वि-मार्गी तरलता ऑपरेशन्सद्वारे अल्पकालीन दरांचे सक्रिय व्यव स्थापन करण्याचे आश्वासन दिले. या सहाय्यक टिप्पण्यांनी रुपयाला पुनर्प्राप्त करण्यास मदत केली, आता ही श्रेणी ८८.२५-८९.१० दरम्यान अपेक्षित आहे.'
आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'आरबीआय धोरण निकाल आणि ऑटो विक्री डेटा नंतर निफ्टीने बुधवारीच्या सत्रात जोरदार तेजीच्या कॅंडलस्टिकसह बंद केले, त्याने त्याच्या १००-दिवसांच्या ईएमएच्या २४७५० पातळीच्या वरच्या पातळीला पुन्हा प्राप्त केले, जे आधी प्रतिकार म्हणून काम करत होते. निर्देशांकाने १ सप्टेंबरच्या नीचांकी आणि १८ सप्टेंबरच्या उच्चांक २५४५३ दरम्यान फिबोनाची हालचालीचा ६१% मागे घेतला आहे. डेरिव्हेटिव्ह फ्रंटवर, २४७००-२४८०० पातळीवर हेवी पुट राइटिंग उच्च बेस दर्शवते, कमाल ओआय २५००० पातळीवर आहे. एकूणच, भावना सकारात्मक झाली आहे, २४७०० पातळीवर समर्थन (Support Level) आणि २५०००-२५१०० पातळीवर प्रतिकार (Resistance) आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च वेल्थ मॅनेजमेंट सिद्धार्थ खेमका म्हणाले आहेत की,'सलग आठ सत्रांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारांमध्ये जोरदार तेजी दिसून आली, निफ्टी५० २२५ अंकांनी वाढून २४,८३६ (+०.९%) वर बंद झाला. बँकिंग आणि वित्तीय शेअर्समध्ये वाढ झाली, कारण निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक प्रत्येकी १% पेक्षा जास्त वाढले, ज्याला भविष्यातील दर कपातीचे सं केत देणाऱ्या आरबीआयच्या आक्रमक भूमिकेमुळे पाठिंबा मिळाला. अलिकडच्याच वाढीनंतर नफा वसुलीमध्ये ०.४% घसरलेला पीएसयू बँक निर्देशांक वगळता, इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात संपले.आजच्या धोरणात्मक निकालात, आरबीआयने सल ग दुसऱ्या बैठकीत बेंचमार्क रेपो दर ५.५% वर अपरिवर्तित ठेवला, तर बँक कर्ज वाढविण्यासाठी सुधारणांचा संच जाहीर केला. मध्यवर्ती बँकेने आर्थिक वर्ष २६ च्या जीडीपी वाढीचा अंदाज ६.८% (६.५% वरून) पर्यंत वाढवला आणि सीपीआय चलनवाढीचा अं दाज २.६% (३.१% वरून) पर्यंत कमी केला, ज्यामुळे गुंतवणूकदारांची भावना आणखी उंचावली. आरबीआयने पायाभूत सुविधांसाठी वित्तपुरवठा सुलभ करण्याच्या उद्देशाने नियामक बदल लागू केल्यानंतर एनबीएफसी शेअर्समध्ये ३-५% वाढ झाली.
आयएमडीने गेल्या पाच वर्षातील भारतातील सर्वोत्तम मान्सून (दीर्घकालीन सरासरीपेक्षा ८% जास्त) नोंदवल्यानंतर ग्रामीण भागातील मागणी वाढल्याने ऑटो आणि एफएमसीजी कंपन्यांची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे; तसेच जीएसटी दर कपातीचा पाठिंबाही या कंपन्यांना मिळाला आहे. दरम्यान, गुंतवणूकदार सप्टेंबर २५ साठी ऑटो विक्रीच्या सुरू असलेल्या घोषणांवर बारकाईने लक्ष ठेवतील. गुरुवारी दसरा आणि गांधी जयंतीसाठी भारतीय शेअर बाजार बंद राहतील, परंतु शुक्रवारीही सकारात्मक गती कायम राह ण्याची अपेक्षा आहे, कारण त्याला अनुकूल चलनविषयक धोरण, अनुकूल मान्सून हंगाम आणि सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने पाठिंबा मिळेल.'
आजच्या रेपो दरातील स्थिरतेच्या निर्णयावर बाजारातील दृष्टीने विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार विश्लेषक अजित भिडे म्हणाले आहेत की,'अपेक्षेनुसार रिझर्व बँकेने रेपो रेट स्थिर ठेवले.रूपया चे बाॅडस आंतरराष्ट्रीय स्तरावर आणणार आहे आणि बॅ कीग रिफार्म्स आणणार असल्यामुळे बाजार आज २४६०० पातळीवरून फिरला व अनपेक्षित रित्या वर आला. बॅक निफ्टी मुळेच बाजार वर खेचला गेला व टेक्निकली तो किती वर जातो हे पहावे लागेल.विदेशी गुंतवणूकदारांकडून अजूनही रोजच विक्री सुरू आ हेच. तरी ही आजची तेजी काही वेगळे संकेत देते का हे पडताळून पहावे लागतील.अमेरिकेतील सुप्रीम कोर्टात एक ते दोन महीन्यात टॅरिफ बद्दलचे निकाल अपेक्षित आहेत .जर शुल्कवाढ रद्द झाली तर काही कालावधी साठी तरी बाजारात तेजी दिसून येईल अ न्यथा जानेवारीत टॅरिफचे परिणाम पहायला मिळतील. उद्या बाजार बंद रहाणार असल्याने आजच डेरिऐटिवमध्ये सेटलमेंटचा परीणाम बाजारावर दिसतोय.पण आज बाजाराचा मूड बदलेला दिसत आहे.रूपयाचे आंतरराष्ट्रीय बाॅडस,बॅकिंग सेक्टरमधील परिवर्तन (Reforms) या सर्व गोष्टींमुळेच बाजार आज खुश झाल्यामुळे शाॅर्ट सेलर्स ना शाॅर्ट कवरींग शिवाय आज पर्याय नव्हता.या सगळ्याचे परिणाम म्हणून आज बाजारात छान मुड पहायला मिळाला.'
आजच्या बाजारातील सोन्यावर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'अमेरिकन सरकारच्या शटडाऊनच्या चिंतांमुळे सुरक्षित-निवास मागणीला पाठिंबा मिळाल्यानंतर COMEX सो न्याचा भावही ९०० रुपयांनी वाढून ११८१९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. सत्र अस्थिर राहिले, जवळजवळ $८० च्या नफा बुकिंगमुळे किंमती $३८७० वरून $३७९० पर्यंत खाली आल्या आणि त्यानंतर पुन्हा खरेदी केल्याने सोन्याने $३८९५ च्या वर नवीन उच्चांक गा ठला. MCX वर, किमतींनी ११५५०० पातळीच्या जवळ आधार चाचणी केली आणि नंतर ११७७०० रूपये पातळीच्या पूर्वीच्या उच्चांकाला मागे टाकून सध्याच्या शिखरावर पोहोचल्या. पुढे डेटा-हेवी आठवडा असल्याने, प्रमुख अमेरिकन आर्थिक प्रकाशनांसह, सोने ११४०००-११९००० रूपये पातळीच्या विस्तृत श्रेणीत अत्यंत अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे.'