
देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील मिठबाव येथील शाखेला भेट देऊन संघ स्वयंसेवकांसोबत विजयादशमीचा उत्सव साजरा केला.
या कार्यक्रमात तालुक्यातील विविध भागांमधून आलेल्या स्वयंसेवकांसोबत त्यांनी संवाद साधला व संघ कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित संचलनातही नितेश राणे स्वयंसेवकांसोबत उत्साहाने सहभागी झाले.
View this post on Instagram
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या प्रसंगी राणे यांनी संघाच्या अनुशासन, राष्ट्रभक्ती आणि सेवाभाव या मूल्यांचा गौरव केला व “संघाचे शताब्दी वर्ष हे केवळ उत्सव नसून भविष्यातील भारताचा अढळ निर्धार आहे” असे मत व्यक्त केले.