Wednesday, October 1, 2025

बॉलीवूडचे सुपरस्टार्स आणि त्यांच्या सुपर लक्झरियस व्हॅनिटी व्हॅन

बॉलीवूडचे सुपरस्टार्स आणि त्यांच्या सुपर लक्झरियस व्हॅनिटी व्हॅन

मुंबई : कलाकारांसाठी व्हॅनिटी व्हॅन अत्यंत महत्वाची असते. शूटिंग दरम्यान थोडा वेळ थांबण्यासाठी, रेडी होण्यासाठी, मेकअपसाठी किंवा खाण्यासाठी व्हॅनिटी व्हॅन गरजेची असते. कलाकारांसाठी त्यांची व्हॅनिटी व्हॅन म्हणजे मिनी हाऊस.

८०-९० च्या काळात व्हॅनिटी म्हणेजच एक छोटी रूम मेकअप आणि आरामासाठी मर्यादित असायची. पण हल्ली सगळ्याच सोईसुविधा व्हॅनिटी व्हॅन मध्ये असतात. मग अगदी वॉशरूम पासून सर्वच... चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान प्रत्येक कलाकार आपली व्हॅनिटी सेटवर घेऊन जातात. आताची व्हॅनिटी ही कलाकारांच्या घराप्रमाणेच महाग आणि लक्झरियस असतात. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ या, निवडक मोठ्या कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅनचे किस्से. रणवीर सिंग, शाहरुख खान, जॉन अब्राहाम, कंगना राणावत यांच्या व्हॅनिटी व्हॅन विषयी काही गंमतीदार माहिती वाचू...

रणवीर सिंहची व्हॅनिटी व्हॅन

 

बॉलीवूड मध्ये रणवीर सिंह हा एनर्जीचा पॉवरहाऊस म्हणून ओळखला जातो. रणवीर सिंह च्या ३ व्हॅनिटी शूटिंग वेळी नेहमी त्याच्या सोबत असतात. एक पर्सनल वापरासाठी, दुसरी व्हॅनिटी म्हणजे मिनी जिम, तिसरी मेकअप आणि रेडी होण्यासाठी. इतकंच नव्हे तर त्याचा पर्सनल शेफ त्याच्या खाण्यापिण्याच्या सोयीसाठी व्हॅनिटी मध्ये हजर असतो.

शाहरुख खानची व्हॅनिटी म्हणजे मिनी मन्नत

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या व्हॅनिटी व्हॅनची बातच न्यारी आहे. या व्हॅनिटी व्हॅनला मिनी मन्नत म्हटलं तरी चालेल. लक्झरी अपार्टमेंट प्रमाणेच त्याची व्हॅनिटी व्हॅन सजलेली दिसते.

जॉन अब्राहमच्या व्हॅनिटी व्हॅनची ब्लॅक थिम

 

काळा रंग म्हणजे शक्ती आणि सुसंस्कृतपणाचे प्रतिक. जॉन अब्राहची व्हॅनिटी ब्लॅक थिम मध्ये आहे. फ्लोअर, खिडकी, सीलिंग सगळ्यालाच काळा रंग. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये एन्ट्री केल्यावर ब्लॅक आणि बोल्ड स्टुडिओ मध्ये पोहोचल्यासारखे वाटते.

कंगना राणावतची हटके व्हॅनिटी व्हॅन

कंगना राणावत या सुंदर बॉलीवूड QUEEN प्रमाणे तिची व्हॅन ही तितकीच सुंदर आणि हटके आहे. या सेलिब्रिटीची व्हॅनिटी व्हॅन प्रतीक मालेवार आणि अपूर्व देशमुख यांनी डिझाईन केली आहे. याची खासियत म्हणजे यात शिसम लाकडाचा वापर केला असून, COTTAGE चा लूक दिला आहे.

कशा वाटल्याया या व्हॅनिटी व्हॅन.. त्या जितक्या दिसायला सुंदर असतात तितकाच तिचा खर्च आणि देखभाल करावी लागते. कमीत कमी एका व्हॅनिटी व्हॅनचीच किंमत ७५ लाख ते १ कोटी पर्यंत असते. आणि व्हॅनिटी सांभाळण्याचा खर्च हा १० ते १५ लाख पर्यंत असतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >