दुबई : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी अखेर बीसीसीआय (BCCI) समोर हात जोडले. काल दुबईत झालेल्या आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर हा मोठा आणि अनपेक्षित प्रकार घडला आहे. एसीसीचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या मोहसीन नक्वी यांनी बैठकीनंतर थेट बीसीसीआयकडे माफी मागितली. दोन देशांच्या क्रिकेट बोर्डांमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या अध्यक्षांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे क्रिकेट जगतात चर्चांना उधाण आले आहे.
बीसीसीआयसमोर झुकला नक्वी
आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या दुबईतील बैठकीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी बीसीसीआयकडे माफी मागून संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. आशिया चषक स्पर्धेदरम्यान झालेल्या एका अप्रिय घटनेबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. मोहसीन नक्वी यांनी बीसीसीआयला माफी मागताना नम्रपणे आपले म्हणणे मांडले, "आशिया चषकाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात जे झाले, त्याबद्दल मी माफी मागतो. जे झाले ते व्हायला नको होते." "आपण आता नव्याने सुरुवात करू आणि क्रिकेटला मोठं करू." संबंध सुधारण्याच्या दृष्टीने आणि cordial वातावरण निर्माण करण्यासाठी मोहसीन नक्वी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव याला खास आमंत्रण दिले. "भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने दुबईत स्वतः येऊन आशिया चषक आणि पदकं न्यावी," असे आवाहन मोहसीन नक्वी यांनी केले. या भूमिकेमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने क्रिकेटच्या राजकारणापेक्षा खेळाला महत्त्व देण्याचा संदेश दिला आहे.
नवी दिल्ली : आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेच्या १०० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एक महत्त्वपूर्ण ...
'राजकारण की क्रिकेट?' मोहसीन नक्वींवर शाहिद अफ्रिदीचा निशाणा
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि खेळाडू शाहिद अफ्रिदी (Shahid Afridi) याने नक्वींच्या दुहेरी भूमिकेवर (Dual Role) थेट निशाणा साधला आहे. मोहसीन नक्वी हे पीसीबी अध्यक्षपदासोबतच पाकिस्तानचे गृहमंत्रीपदही सांभाळत असल्याने हा वाद निर्माण झाला आहे. शाहिद अफ्रिदीने मोहसीन नक्वी यांना स्पष्ट विनंती केली आहे. तो म्हणाला, "मोहसीन नक्वी यांना माझी विनंती आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद आणि पाकिस्तानचे गृहमंत्रीपद ही दोन्ही अतिशय महत्त्वाची पदे आहेत आणि ही मोठी कामे आहेत, ज्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो." पीसीबी आणि गृह मंत्रालय हे दोन्ही विभाग पूर्णपणे वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि राजकारण यापैकी एकाची निवड करावी. मोहसीन नक्वी यांच्यासाठी हा निर्णय घेणे सोपे नाही, हे मान्य करत अफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेटच्या गरजांवर लक्ष वेधले. अफ्रिदीच्या मते, सध्या पाकिस्तान क्रिकेटला विशेष लक्ष आणि पूर्ण वेळेची आवश्यकता आहे. त्यांनी पुढे सांगितले की, मोहसीन नक्वी केवळ सल्लागारांवर अवलंबून राहू शकत नाहीत. क्रिकेटच्या भल्यासाठी त्यांनी स्वतः सक्रिय आणि पूर्णवेळ लक्ष देणे गरजेचे आहे.
आशिया चषकाच्या फायनलनंतर नेमकं काय घडलं?
२८ सप्टेंबर रोजी झालेल्या आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. मात्र, या विजयानंतर दुबईच्या मैदानावर ट्रॉफीवरून मोठा वाद आणि गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. सामना संपल्यानंतर जेव्हा पारितोषिक वितरण सोहळा सुरू झाला, तेव्हा हा वाद उफाळून आला. आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री असलेले मोहसीन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघाने स्पष्ट नकार दिला. या भूमिकेमुळे मोठा पेच निर्माण झाला. त्यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन मैदानाच्या बाहेर निघून गेले. अंतिम सामना जिंकल्यानंतरही भारतीय संघाला अद्याप अधिकृतपणे ट्रॉफी मिळालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे.