'झुकलेली मान' ठरतेय मोठी समस्या! जाणून घ्या तुमच्या मानेवर किती किलोचा भार पडतोय आणि 'टेक्स्ट नेक सिंड्रोम'चा वाढता धोका

मुंबई : मोबाईल किंवा लॅपटॉपच्या अतिवापरामुळे सध्या एक नवी आरोग्य समस्या वाढताना दिसत आहे, ती म्हणजे 'टेक्स्ट नेक सिंड्रोम'. डिजिटल स्क्रीनवर काम करताना आपली शरीराची मुद्रा (Posture) अनेकदा वाकलेली असते. या चुकीच्या स्थितीमुळे मानेवर आणि मानेच्या स्नायूंवर खूप ताण येतो, आणि याच ताणामुळे मानेचे दुखणे सुरू होते. आता ही समस्या केवळ वृद्धांमध्येच नाही, तर तरुणाईमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तासन्तास स्क्रीन टाइममुळे तरुणांमध्ये 'टेक्स्ट नेक सिंड्रोम'चे प्रमाण धोकादायक पद्धतीने वाढले आहे.


एका संस्थेच्या अहवालानुसार, भारतात सुमारे ५० टक्के लोकांना दीर्घकाळ टिकणारे कंबरदुखीची (Chronic Back Pain) समस्या आहे. काही वर्षांपूर्वीच्या या आकडेवारीमध्ये आता स्क्रीन टाइम वाढल्यामुळे खूप मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.



'टेक्स्ट नेक सिंड्रोम' म्हणजे काय?


तासन्तास मोबाईल किंवा लॅपटॉपवर वाकून काम केल्यामुळे शरीरात जी वेदनादायक लक्षणे दिसू लागतात, त्याला 'टेक्स्ट नेक सिंड्रोम' असे म्हणतात. या सिंड्रोममध्ये खालील त्रास होऊ शकतात:


मान आणि खांदा दुखणे


मान व डोके सतत दुखणे


हात सुन्न होणे


सतत डोळ्यांवर आणि डोक्यावर ताण जाणवणे


सर्वायकल स्पॉन्डिलायटिस सारखी गंभीर स्थिती ओढवणे.


यापूर्वी मानेचे आणि पाठीच्या कण्याचे हे त्रास साधारणपणे ४० ते ६० वयोगटातील लोकांमध्ये दिसून येत होते. परंतु, आता १८ ते २५ या तरुण वयोगटातही ही लक्षणे मोठ्या प्रमाणावर आढळू लागली आहेत.



मोबाईल वापरताना मानेवर किती वजन पडते?


'Sit Strong' या पुस्तकाच्या लेखिका हॅरीएट ग्रीके यांनी मानेचे आजार आणि मान किती झुकवल्यास मानेवर किती भार पडतो, याबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे. शरीराचा नैसर्गिक भार सांभाळणारी मान, स्क्रीन पाहताना वाकवल्यास तिच्यावर किती प्रचंड दबाव येतो, हे खालील आकडेवारीवरून स्पष्ट होते:


मान झुकवण्याचा कोन मानेवर पडणारा भार (अंदाजे)
0° (सरळ) झुकवल्यास ४.५ - ५ किलो
15° झुकवल्यास १२ किलो
30° झुकवल्यास १८ किलो
45° झुकवल्यास २२ किलो
60° झुकवल्यास २७ किलो


याचा अर्थ, तुम्ही जेव्हा ६० अंशांमध्ये मान वाकवून मोबाईल वापरता, तेव्हा तुमच्या मानेच्या स्नायूंना तब्बल २७ किलो म्हणजेच साधारण एका लहान मुलाचे वजन पेलण्याची कसरत करावी लागते. यामुळे स्नायू, मणके आणि नसांवर अतिरिक्त दबाव येऊन गंभीर दुखणे सुरू होते.



उपाय काय?


हा 'टेक्स्ट नेक सिंड्रोम' टाळण्यासाठी वेळीच आपल्या स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मोबाइल किंवा लॅपटॉप वापरताना मान शक्यतो सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. दर अर्ध्या तासाने ब्रेक घ्या, मानेचे सोपे व्यायाम करा आणि नेहमी योग्य 'पोस्चर' ठेवण्याची सवय लावा. अन्यथा, भविष्यात मानेचे आणि पाठीच्या कण्याचे गंभीर आजार ओढवू शकतात.

Comments
Add Comment

ग्राहक संरक्षण कायद्यात बदल करण्याची ग्राहक पंचायतची मागणी

मुंबई  : देशातील ग्राहक न्यायालयांमध्ये सध्या साडेपाय लाखांहून अधिक तक्रारी प्रलंबित आहेत. सुनावणीदरम्यान

नवीन कामगार कायद्यांमुळे वेतन कमी होणार नाही; केंद्राचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : देशात नवीन कामगार कायदे लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होईल, अशी चिंता सध्या

नोटबंदीच्या ९ वर्षांनंतर दिल्लीत ३ कोटींच्या जुन्या नोटा जप्त

नवी दिल्ली  : नोटाबंदीच्या नऊ वर्षांनंतरही, दिल्लीत ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. दोन

भारत जिंकला, टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानने टेकले गुडघे!

दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेत भारतीय युवा संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपला दबदबा

रॅपिडो प्रवासात तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, तरुणीच्या धैर्यामुळे अनर्थ टळला

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिमेतील सिंधी गेट परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

दुबईत आज भारत-पाक हाय व्होल्टेज सामना

शतकवीर वैभव सूर्यवंशीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष दुबई : १९ वर्षांखालील आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत भारतीय