पाक व्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका! शहाबाज शरीफ सरकारविरूद्ध लोकं उतरली रस्त्यावर

नवी दिल्ली : पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सोमवारी पाकिस्तान सरकारविरूद्ध मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरले. हे लोक आंदोलन आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे आंदोलन म्हणून गणले जात आहे. अवामी अॅक्शन कमिटीने आंदोलनाची हाक दिली होती. अवमी कमिटीने बंद आणि चक्का जामचा नारा दिला होता. या आंदोलनाने भागात चांगलाच तणाव निर्माण झाल्यानंतर पाकिस्तान सरकारने इस्लामाबादवरून सुरक्षा दल पाक व्याप्त काश्मीरमध्ये पाठवली आहेत. त्याचबरोबर या भागातील इंटरनेट सेवादेखील मध्यरात्रापासून बंद करण्यात आली आहे.


अवामी कमिटीला गेल्या महिन्यापासून पाक व्याप्त काश्मीरमध्ये चांगला जनाधार लाभत आहे. त्यांच्या नावावर हजारो लोकं रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. या भागातील सर्व लोकांचा पाकिस्तान सरकारने पाक व्याप्त काश्मीरकडे राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या भागाचा विकास करण्यासाठी अवामी कमिटीने ३६ मागण्या ठेवल्या आहेत. यात स्ट्रक्चरल रिफॉर्म, पाक व्याप्त काश्मीरमधून पाकिस्तानमध्ये राहण्यास आलेल्या काश्मीरी शरणार्थींसाठी १२ जागा राखीव ठेवण्यासाठीची मागणी केली आहे. याचबरोबर अनुदान आणि राज्यातील प्रोजेक्ट्समधून मिळणारा कर वाढवून देण्यात यावा अशा मागण्यांचा समावेश आहे.


अवामी कमिटीचीचे प्रमुख नेते शौकत नवाज मीर म्हणाले, ‘आमचे कॅम्पेन हे कोणत्याही संस्थेविरूद्ध नाही. मात्र आमच्या लोकांना गेल्या ७० वर्षात मुलभूत अधिकार नाकारण्यात आले आहे. हे आंदोलन त्याबाबत आहे. आता खूप झाले. आमचे हक्क आम्हाला द्या नाहीतर लोकांच्या रोषाला सामोरे जा.’


दरम्यान, हजारो लोक रस्त्यावर उतरलेले पाहिल्यानंतर पाकिस्तान सरकार लगेचच सक्रीय झाले आहे. काही दिवसांपासून पाक व्याप्त काश्मीरमध्ये सशस्त्र दलाच्या अनेक गाड्या शहरात मार्च करत आहेत. हजारो सशस्त्र सैनिक पंजाबमधून पाक व्याप्त काश्मीरमध्ये पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी महत्वाच्या शहरांच्या एन्ट्री आणि एक्झिट पॉईंटवर नाकाबंदी केली आहे. इस्लमाबादमधील सरकारने एक हजार अतिरिक्त पोलीस दल देखील तैनात केले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘शांतता ही लोकं आणि प्रशासन या सर्वांची जबाबदारी आहे.’ याचबरोबर अवामी कमिटीच्या लोकांसोबत सरकारनं चर्चेचा वेग वाढवला आहे. मात्र १३ तासांच्या चर्चेनंतर कमिटीने वाटाघाटी करण्यास नकार दिला आहे. त्यांनी चर्चा ही अपूर्ण आणि कोणत्याही निष्कर्षाविना संपल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली सात पर्यटन स्थळे खुली

नवी दिल्ली  : जम्मू-काश्मीर प्रशासनाने सोमवारी (दि. २९) काश्मीर खोऱ्यातील सात प्रमुख पर्यटन स्थळे पुन्हा खुली

तामिळनाडू चेंगराचेंगरी : नड्डांकडून एनडीए शिष्टमंडळ स्थापन, श्रीकांत शिंदेंचाही समावेश

नवी दिल्ली : तामिळनाडूच्या करूरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी तीव्र दु:ख

भाजपचे दिल्लीशी विश्वासाचे, भावनेचे नाते; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा

नवी दिल्ली : दिल्ली आणि भाजपाचे नाते खूप जुने आहे. सेवा, संस्कार आणि सुख-दुःखाचे साथीदार असलेले हे शहर आहे. जनसंघ

नक्षलवाद्यांसोबत शस्त्रसंधी अमान्य, अमित शाहांनी फेटाळला प्रस्ताव

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात सुरक्षा पथकांनी देशातील नक्षलवाद ३१ मार्च २०२६

PoK : ३००० पाकिस्तानी सैनिक तैनात, इंटरनेट आणि फोन सेवा बंद; PoK मध्ये नेमकं काय शिजतंय?

मुजफ्फराबाद : पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सध्या मोठी राजकीय आणि सामाजिक उलथापालथ होत आहे. स्थानिक नागरिक आणि

IND vs PAK: मैदानावरही ऑपरेशन सिंदूर!' पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर विजयानंतर केले खास ट्विट

नवी दिल्ली: भारताने आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून ९व्यांदा विजेतेपद पटकावल्यानंतर