
मुंबई:भारतातील मोठ्या फिनेटक कंपनीतील एक कंपनी असलेल्या पेमेंट्स अॅप पेटीएमने गोल्ड कॉईन्स सुरू केले आहेत. या आगळ्यावेगळ्या योजनेत प्रत्येक पेमेंटवर वापरकर्त्यांना (Users) गोल्ड कॉईन्स मिळतील जे सहजपणे पेटीएम डिजिटल गोल्डमध्ये बदलता येतील. त्यामुळे दररोजचे पेमेंट्स आता बचतीचे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे साधन ठरणार आहेत. कंपनीने यावेळी स्पष्टीकरण दिले आहे की,'यामुळे कुटुंबे आणि व्यवसायांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारांना बचत आणि भारतातील सर्वात विश्वासार्ह संपत्तीत गुंतवणुकीत रूपांतरित करण्याची संधी मिळेल.'
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दुकानांवर स्कॅन अँड पेपासून ऑनलाइन खरेदी, मनी ट्रान्सफर, रिचार्ज, बिल पेमेंट्स आणि नियमित खर्चांपर्यंत पेटीएमवर केलेल्या प्रत्येक व्यवहारावर आता ट्रा न्झॅ क्शन व्हॅल्यूच्या १% इतके गोल्ड कॉईन्स मिळतील. युपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे केलेल्या पेमेंट्सना हे लागू होईल, तर क्रेडिट कार्ड आणि रूपे क्रेडिट कार्ड ऑन युपीआय वापरल्यास दुप्पट गोल्ड कॉईन्स मिळतील. हे गोल्ड कॉईन्स लगेच डिजिटल गोल्डमध्ये रूपांतरित करता येतात तसेच अतिरिक्त डिजिटल गोल्ड खरेदी करून दीर्घकालीन संपत्ती निर्मा ण करता येते.
कंपनीच्या मते,ही योजना सरकारच्या आत्मनिर्भर भारत या दृष्टिकोनाशी आणि जीएसटी सुधारणांशी सुसंगत आहे, ज्यामुळे घरांमध्ये आणि व्यवसायांमध्ये कार्यक्षमता आणि वास्तविक बचत झाली आहे. पेटीएममुळे आता ही बचत डिजिटल गोल्डमध्ये बदलता येणार असून, आर्थिक सुरक्षितता अधिक बळकट होईल आणि संपत्ती निर्मितीची संस्कृती अधिक जोमाने पुढे जाईल असेही कंपनीने यावेळी स्पष्ट केले.