“कांतारा चॅप्टर १” अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये धुमाकूळ; रिलीज होण्याआधीच केली एवढी कमाई !

मुंबई : साऊथच्या सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा चित्रपट “कांतारा चॅप्टर १” ने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स तिकीट बुकिंग सुरू झालं असून, रिलीज होण्याआधीच निर्मात्यांनी मोठी कमाई केली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षक या चित्रपटाला थिएटरमध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.



“कांतारा चॅप्टर १” ने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये किती कमाई केली?


मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी “कांतारा चॅप्टर १” साठी ५,१९५ शो बुक झाले आहेत. आतापर्यंत एकूण १,३१,५२७ तिकिटं विकली गेली आहेत. ब्लॉक सीट्सचा विचार केल्यास, चित्रपटाने रिलीज होण्याआधीच जवळपास ₹८.११ कोटींची कमाई केली आहे. कानडी आवृत्तीची सर्वाधिक तिकीटं विकली गेली असून, कानडीमध्ये ११८,४४१ तर हिंदीमध्ये १०,५०३ तिकीटांची विक्री झाली आहे. ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.


ऋषभ शेट्टीच्या प्रदर्शित ‘कांतारा’चा पहिला भाग २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. सुमारे १४ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४०० ते ५०० कोटींच्या कमाईचा रेकॉर्ड केला. आता ‘कांतारा चॅप्टर २’ या पहिल्या भागाचा विक्रम मोडेल अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. या चित्रपटात ऋषभ शेट्टीसोबत गुलशन देवैया, जयराम आणि रुक्मिणी वसंत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या कलाकारांना पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.


‘कांतारा चॅप्टर १’ २ ऑक्टोबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा “सनी संस्कार की तुलसी कुमारी” देखील रिलीज होणार आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये तगधीत स्पर्धा अपेक्षित आहे. दोन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करेल, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.

Comments
Add Comment

प्रसिद्धी, पैसा आणि नावापासून दूर जाऊन ही प्रसिद्ध अभिनेत्री जगतेय संन्यासी आयुष्य!

मुंबई : अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी आणि यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. त्यासाठी काही कलाकार मोठा

महाराष्ट्राचा लाडका प्रणित मोरे ‘बिग बॉस१९’च्या घराचा नवा कॅप्टन !

मुंबई : ‘बिग बॉस १९’ रिऍलिटी शो चांगलाच गाजत आहे. रोज नवे वाद,प्रेम आणि राजकारण या शो मध्ये पाहायला मिळतंय. याच शो

गौतमी पाटील आणि अभिजीत सावंत यांचं नेमकं चाललंय तरी काय?

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात सध्या एक नव्या जोडीची चर्चा रंगली आहे ‘इंडियन आयडॉल’ फेम अभिजीत सावंत आणि लोकप्रिय

जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा : ‘अभंग तुकाराम’

मुंबई : महाराष्ट्राला संत-महात्म्यांची उज्ज्वल परंपरा आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या

साईबाबांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवींची प्रकृती गंभीर, उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. सेप्टिक

‘द फॅमिली मॅन ३’ लवकरच प्रेक्षकांसमोर; प्राइम व्हिडिओने केली अधिकृत घोषणा

मुंबई : प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतीक्षेनंतर अखेर प्राइम व्हिडिओने बहुचर्चित आणि सुपरहिट वेब सिरीज ‘द फॅमिली